Air India Plane Crash – मी कसा वाचलो मलाच माहीत नाही… एकमेव बचावलेल्या विश्वास कुमार रमेश यांनी सांगितली आपबिती

Air India Plane Crash – मी कसा वाचलो मलाच माहीत नाही… एकमेव बचावलेल्या विश्वास कुमार रमेश यांनी सांगितली आपबिती

अहमदाबादच्या विमान अपघातातून एकमेव बचावलेला व्यक्ती म्हणजे विश्वास कुमार रमेश. इतक्या भीषण अपघातातून वाचणे हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. विश्वास कुमार रमेशवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अहमदाबाद विमान दुर्घटना मी डोळ्याने पाहिलीय. मला स्वःतालाच माहीत नव्हते की मी वाचेन की नाही. मी विमानाच्या दुर्घटनेतून कसा वाचलो हे मलाच माहीत नाही.

एक वेळ मला वाटले की, मी आता मरणार आहे. विमानाच्या खिडकीतून थेट बाहेर फेकला गेलो. त्यानंतर माझे डोळे उघडले तर मला वाटले की मी जिवंत आहे. दुर्घटनेनंतर मी विमानातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. टेक ऑफच्या अवघ्या काही सेकंदाला जाणवले होते की, विमान अचानक थांबले आहे. काही सेकंदात विमानातील लाइट ऑन झाली आणि वेगाने विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळले. माझ्या बाजुचा विमानाचा भाग भिंतीला लागला नाही. परंतु, विमानाचे गेट तुटले होते. त्यामुळे मला बाहेर पडणे शक्य झाले. माझा उजवा हात थोडा भाजला आहे. त्यानंतर मला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणण्यात आले, असे रमेश यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;