दिव्यातील बेकायदा इमल्यांवर महापालिकेचा बुलडोझर, कोर्टाच्या आदेशानंतर आयुक्तांवर नामुष्की

दिव्यातील बेकायदा इमल्यांवर महापालिकेचा बुलडोझर, कोर्टाच्या आदेशानंतर आयुक्तांवर नामुष्की

बेकायदा बांधकामाचे माहेरघर असलेल्या दिव्यातील 17 इमल्यांवर अखेर महापालिकेने आज बुलडोझर फिरवला. दिवा परिसरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामाबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. दरम्यान एका प्रकरणावर सुनावणी देत असताना उच्च न्यायालयाने इमारतींची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर खडबडून जाग आलेल्या आयुक्तांवर दिव्यात जाऊन बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याची नामुष्की ओढवली.

दिवा परिसरात बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहे. मात्र या तक्रारींकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सामाजिक कार्यकत्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने गुरुवारी महापालिका आयुक्तांवर ताशेरे ओढले. यावेळी 17 बेकायदा इमारतींप्रकरणी न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी व आरिफ एस. डॉक्टर जे. यांनी न्यायालयाचे विशेष अधिकारी नेमणूक केली. या अधिकाऱ्यांना सकाळीच आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात हजर राहण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार न्यायालयीन अधिकारी, आयुक्त राव आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दिव्यातील ‘त्या’ बेकायदा इमारतींची पाहणी केली. तसेच 17 बेकायदा इमारतींवर हातोडा फिरवत कारवाईचा बडगा उगारला.

काय आहेत उच्च न्यायालयाचे आदेश?
ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांची चौकशी सुरू झाल्यानंतर त्याचा अहवाल सहा आठवड्यांच्या आत सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या कारवाईवेळी न्यायालयाने नेमलेल्या अधिकाऱ्यांना संबंधित व्यक्तींची साक्ष व नोटिसा देण्याची प्रक्रिया राबवण्याची संमती देण्यात आली आहे. त्यानंतर प्राप्त अहवालाच्या आधारे न्यायालय पुढील आदेश देईल. या अहवालात महापालिकेचे अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावरदेखील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;