डोक्यावर अक्षता पडण्याआधीच  रोशनीने घेतला जगाचा निरोप 

डोक्यावर अक्षता पडण्याआधीच  रोशनीने घेतला जगाचा निरोप 

आकाश गायकवाड, डोंबिवली

रोशनीचे लग्न ठरले होते. नोव्हेंबरअखेर साखरपुडा आणि मार्चमध्ये लग्न असे स्वप्न डोळ्यांत घेऊन एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या डोंबिवलीच्या रोशनीने गुरुवारी अहमदाबादहून लंडनकडे ड्रीमलायनरमधून उड्डाण केले.  इंटरनॅशनल विमानात सेवा देण्याची ही पहिलीच संधी, ही संधी तिची अखेरची ठरली आणि डोक्यावर अक्षता पडण्याआधीच तिने जगाचा निरोप घेतला.

डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथ येथील नव उमिया कृपा सोसायटीत रोशनी सोनघरे ही तिच्या कुटुंबासह राहत होती. मूळचे ग्रॅण्ट रोडचे असलेले सोनघरे कुटुंब डोंबिवलीत स्थायिक झाले होते. मुंबईतील एका तरुणाशी तिचे लग्नही ठरले होते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. लहानपणापासून  एअर होस्टेस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या रोशनीने ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही साकारले होते. सुरुवातीला स्पाईस जेट व त्यानंतर एअर इंडियात ती भरती झाली. गुरुवारी अहमदाबादमधून टेकऑफ घेतलेल्या ड्रीमलायनर विमानात तिची पहिलीच आंतरराष्ट्रीय ड्युटी. त्यामुळे ती प्रचंड खुशीत होती. पण विमान दुर्घटनेत तिच्या संसाराच्या स्वप्नांचा कोळसा झाला.  

रोशनीच्या आईला अजून काहीही माहीत नाही

विमान दुर्घटनेची बातमी कळताच तिचे वडील राजेंद्र, भाऊ विघ्नेश व वहिनी तातडीने अहमदाबादला रवाना झाले. रोशनीच्या आईला रक्तदाबाचा त्रास असल्याने तिला अद्यापही ही बातमी सांगितलेली नाही, अशी माहिती रोशनीचे काका सचिन सोनघरे यांनी दिली.

सोशल मीडियावर 60 हजार फॉलोअर्स

रोशनीने सोशल मीडियावर ‘स्काय लव्ह हर’ या नावाने आपली ओळख निर्माण केली होती. ती सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर होती. इन्स्टाग्रामवर तिचे 60 हजार फॉलोअर्स होते. ‘स्काय लव्ह हर’ या युजर नेमने ती विमान प्रवास, सौंदर्य, जीवनशैली आणि तिच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित व्हिडीओ शेअर करीत असे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Nagpur News – नागपूरमध्ये इलेक्ट्रीक सामानाच्या गोदामाला भीषण आग, दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी Nagpur News – नागपूरमध्ये इलेक्ट्रीक सामानाच्या गोदामाला भीषण आग, दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
नागपूर शहरातील महाल परिसरात एका इलेक्ट्रिक सामानाच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत गोदाम मालकासह दोघांचा होरपळून मृत्यू झाला तर...
सर्च ऑपरेशनदरम्यान नक्षलवाद्यांकडून IED स्फोट, सीआरपीएफचा एक अधिकारी शहीद
खेळाप्रमाणे राजकरणात देखील टीमवर्क गरजेचं – आदित्य ठाकरे
Sindhudurg News – हायवेवर सापडलेली बॅग मुळ मालकाला केली परत, नांदगाव ग्रामस्थांची माणुसकी
Sindhudurg News – फोंडाघाटात दोन ट्रक समोरासमोर धडकले, दोन जण जखमी; एकावर गुन्हा दाखल
Rain Update – राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट
Dubai Fire – दुबईतील 67 मजली इमारतीला भीषण आग, 4 हजाराहून अधिक नागरिक रेस्क्यू