सरकारची ‘सक्षम’ आरोग्य यंत्रणा! मृत अर्भकाला पिशवीत घालून पित्याचा नाशिक ते खोडाळा एसटीने 90 किमी प्रवास

सरकारची ‘सक्षम’ आरोग्य यंत्रणा! मृत अर्भकाला पिशवीत घालून पित्याचा नाशिक ते खोडाळा एसटीने 90 किमी प्रवास

>> भगवान खैरनार

राज्य सरकारची ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा किती ‘सक्षम’ आहे याचे आणखी एक धक्कादायक वास्तव आज समोर आले आहे. शववाहिनी न मिळाल्याने एका गरीब आदिवासी पित्याला त्याचे मृत अर्भक पिशवीत घालून नाशिक सिव्हिल हॉस्पिटल ते खोडाळ्यातील जोगलवाडी असा तब्बल 90 किलोमीटरचा प्रवास एसटीने करावा लागल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मोखाडय़ातील या मन सुन्न करणाऱया घटनेने अवघा पालघर जिल्हा हादरला आहे.

मोखाडा तालुक्यात माता व बालमृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना सरकारी आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले आहेत. खोडाळापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जोगलवाडीमध्ये राहणारी अविता कवर (26) या गर्भवती महिलेला बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास प्रसूतिकळा सुरू झाल्या. त्यामुळे पती सखाराम याने कॉल करूनही रुग्णवाहिका आलीच नाही. दुसऱया दिवशी सकाळी 8 वाजता पुन्हा एकदा रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न करूनही अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. अखेर दुपारी अविताला खोडाळा आरोग्य केंद्रात दाखल केले.

मातेचा जीव वाचला

नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सर्व आरोग्य तपासण्या तातडीने केल्यानंतर अविता कवर या महिलेवर शस्त्र्ाक्रिया करून मृत अर्भक बाहेर काढले. त्यामुळे तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. मात्र मृत अर्भकाला आपल्या जोगलवाडी या गावात नेण्यासाठी शववाहिकाच मिळाली नाही. अखेर त्याने ते अर्भक पिशवीत टाकून नाशिक ते जोगलवाडी असा 90 किलोमीटरचा प्रवास एसटीने केला. त्यानंतर अर्भकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा प्रकार समजताच ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

– खोडाळ्यातील डॉक्टरांनी तपासले असता बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे महिलेला मोखाडय़ाच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
– गुरुवारी सायंकाळी 6 च्या सुमारास अविता हिला मोखाडय़ाच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. पण दुर्दैवाने तिचे बाळ पोटातच दगावले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले.
– बाळ दगावल्याने मातेचाही जीव धोक्यात आला होता. त्यामुळे पुढील उपचारासाठी तिला मोखाडय़ाहून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पतीला पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी मारले

वेळेवर रुग्णवाहिका तसेच उपचार न मिळाल्याने संतापलेला पती सखाराम हा खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना जाब विचारण्यासाठी गेला. यावेळी बाचाबाची झाल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. मात्र पोलिसांनी त्याला कोणतीही शहानिशा न करता किंवा झालेल्या घटनेची माहिती न घेता लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीची चौकशी करण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;