जिल्हाधिकाऱ्यांचा दांडीबहाद्दर 19 नायब तहसीलदारांना दणका

जिल्हाधिकाऱ्यांचा दांडीबहाद्दर 19 नायब तहसीलदारांना दणका

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह 7 उपजिल्हाधिकाऱ्यांनी एकाचवेळी जिल्हय़ातील सर्व तहसील कार्यालयांची अचानक झाडाझडती घेतली. यामध्ये 19 नायब तहसीलदार, तर 134 कर्मचारी चक्क गैरहजर असल्याचे आढळले.  त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या दांडीबहाद्दरांचे एक दिवसाचे वेतन कपात करून त्याची सेवापुस्तिकेत नोंद घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः फुलंब्री तहसील कार्यालयाची झाडाझडती घेतली. यासाठी त्यांनी दैनंदिन वेशभूषा बदलून जीन्स पँट आणि शर्ट परिधान केला होता. त्यांचे शासकीय वाहनही त्यांनी तहसील कार्यालयापासून दूर अंतरावर उभे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आपली ओळख तहसीलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना पटू नये, यासाठी ही वेशभूषा बदलल्याचे त्यांनी ‘सामना’ शी बोलताना सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;