शनी शिंगणापूर मंदिर संस्थानने 114 मुस्लिम कर्मचार्‍यांना कामावरून काढले, हिंदू संघटनांनी इशारा देताच कारवाई

शनी शिंगणापूर मंदिर संस्थानने 114 मुस्लिम कर्मचार्‍यांना कामावरून काढले, हिंदू संघटनांनी इशारा देताच कारवाई

प्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर संस्थानने त्यांच्याकडे नोकरीला असलेल्या 114 मुस्लिम कर्मचार्‍यांना कामावरून काढले आहे. हिंदू संघटनांनी या मुस्लिम कर्मचार्‍यांना कामावरून काढण्याची मागणी केली होती, अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथे शनी महाराजांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येतात. मंदिर संस्थानकडे शेकडो कर्मचारी कामाला असून, त्यात 114 मुस्लिम कर्मचारी आहेत. या मुस्लिम कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात यावे, नसता 14 जून रोजी मोठे आंदोलन करण्याचा इशारा हिंदू संघटनांनी दिला होता. हिंदू संघटनांच्या इशार्‍यापुढे मान झुकवत मंदिर संस्थानने 114 मुस्लिम कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. हिंदू संघटनांनी आंदोलन करण्यापूर्वीच संस्थानने हा निर्णय घेतला.

मंदिर संस्थानने एकूण 167 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले असून, यात 114 मुस्लिम कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. अनियमितता आणि बेशिस्तीचे कारण देत या कर्मचार्‍यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला.

शनी महाराजांच्या चौथर्‍यावर मुस्लिम लोकांच्या हाताने काम करून घेण्यात येत असल्याच्या निषेधार्थ हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यावर मंदिर संस्थानच्या वतीने 114 मुस्लिम कर्मचारी आहेत, मात्र मंदिर परिसरात एकही मुस्लिम कर्मचारी कामाला नसतो, असा खुलासा केला होता. मुस्लिम कर्मचारी हे संस्थानच्या कृषी, कचरा व्यवस्थापन तसेच शिक्षण विभागात काम करत असल्याचे संस्थानचे म्हणणे होते. 114 पैकी 99 कर्मचारी मागच्या पाच महिन्यांपासून कामावर येत नसून त्यांचे पगारही थकवण्यात आल्याचेही संस्थानच्या वतीने सांगण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;