बच्चू कडू यांच्या उपोषणाला समर्थन, शहागड येथे रविवारी ‘चक्का जाम’ आंदोलनात सहभागी होण्याचे मनोज जरांगे यांचे आवाहन

बच्चू कडू यांच्या उपोषणाला समर्थन, शहागड येथे रविवारी ‘चक्का जाम’ आंदोलनात सहभागी होण्याचे मनोज जरांगे यांचे आवाहन

शेतकर्‍यांना कर्जमाफी तसेच दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या उपोषणाच्या समर्थनार्थ 15 जून रोजी धुळे-सोलापूर महामार्गावर शहागडच्या पैठण फाट्यावर ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. सकाळी 10 वाजता होणार्‍या या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या वतीने शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. महायुतीने दिलेला शब्द प्रत्यक्षात आणावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तसेच माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोझरी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी 11 जून रोजी मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. या आंदोलनाच्या समर्थनार्थ 15 जून रोजी सकाळी 10 वाजता शहागडच्या पैठण फाट्यावर ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार असून यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;