कोकण रेल्वे स्थानकांवर परप्रांतीय पोटभाडेकरू

कोकण रेल्वे स्थानकांवर परप्रांतीय पोटभाडेकरू

>>दुर्गेश आखाडे

रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरील स्टॉलचा मालक कोण आणि चालक कोण हा प्रश्न पुढे आला आहे. कोकण रेल्वेने स्थानिकांच्या रोजगार निर्मितीसाठी भाडय़ाने दिलेल्या स्टॉलवर परप्रांतीयांनी रोजगार बळकावला आहे. मूळ स्टॉलधारकाने ते स्टॉल दुसऱ्या व्यक्तीला भाडय़ाने चालवायला देत पोटभाडेकरू नेमले असून त्यातील काही स्टॉलवर परप्रांतीयच पोट भरत आहेत.

रत्नागिरी रेल्वेस्थानकात सहा ते सात स्टॉल आहेत. कोकण रेल्वे प्रकल्पात अनेकांची जमीन संपादित करण्यात आली होती. त्या भूमिहीन ग्रामस्थांसाठी कोकण रेल्वेने प्लॅटफॉर्मवरील स्टॉल देण्याची योजना आखली. कोकण रेल्वे प्रकल्पात जमीन संपादित झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना, अपंग व्यक्ती आणि इतर व्यक्तींसाठी हे रेल्वे प्लॅटफॉर्मवरील स्टॉल भाडय़ाने दिलेले जातात. रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील दोन्ही प्लॅटफॉर्मवर आपण फेरफटका मारला तर स्थानिकांच्या रोजगारासाठी दिलेल्या स्टॉलवर परप्रांतीय रोजगारावर कब्जा केलेला दिसेल.

महिन्याला लाखभर भाडे?

n रत्नागिरी रेल्वे स्थानकात गर्दीमुळे स्टॉलधारकाना चांगले उत्पन्न मिळते. मूळ स्टॉलधारकाने दुसऱ्या स्टॉलधारकाला दामदुप्पट भाडय़ाने स्टॉल दिले आहेत. काही ठिकाणी मध्यस्थी आहेत. म्हणजे तीन जणांची साखळी असून मधला कमिशन एजंट असल्याची चर्चा सुरू आहे. दामदुप्पट भाडयामुळे पदार्थाच्या दर्जावर परिणाम झाला आहे.

नक्की मालक कोण?

n कोकण रेल्वेने कराराने दिलेल्या स्टॉलवर मूळ स्टॉलधारक व्यवसाय करताना दिसत नाही. हे मूळ स्टॉलधारकाने हे स्टॉल दुसऱ्या व्यक्तीला भाडय़ाने दिले आहेत. कारण प्लॅटफॉर्मवरील स्टॉलचा मक्की मालक कोण? नक्की चालक भाडेकरू कोण? याचा शोध कोकण रेल्वे प्रशासनाने घ्यायला हवा.

आम्ही याबाबत स्टॉलधारकांची तपासणी करू. तसेच स्टॉलवर पाण्याची बाटली वीस रूपयांनी विकली जाते त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करू – शैलेश बापट, क्षेत्रीय प्रबंधक, कोकण रेल्वे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;