तोंडात मधमाशी गेली अन्…; करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीसाठी कंगना रनौतची पोस्ट
आपल्या अभिनयाने बॉलीवूडचं एक दशक गाजवणारी अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गुरुवारी (12 जून 2025) लंडनमध्ये गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळत असताना त्याला गुदमरल्यासारखे वाटलं आणि नंतर खेळ थांबवून तो मैदानाबाहेर गेला होता. मधमाशीने घशात दंश केल्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या मृत्यूनंतर अनेकांनी भावनिक पोस्ट शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांनी सुद्धा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही एक दु:खद घटना असल्याच म्हटलं आहे.
कंगना रनौतने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ती म्हणाली की, आणखी एक अविश्वसनीय घटना, करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर पोलो ग्राउंडवर होता, तेव्हा त्यांच्या तोंडात मधमाशी गेली तिने दंश केला आणि त्याची श्वसननलिका बंद झाली. यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता, म्हणून त्याने खेळ थांबवण्यास सांगितले आणि लगेचच त्याला हृदयविकाराच्या झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. ही एक दु:खद बातमी आहे. 2025 मध्ये मी आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व विचित्र घटना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.” असं म्हणत तिने सर्वांनी सुरक्षित राहण्याचे आणि देवाची प्रार्थना करण्याचे आवाहन केलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List