वन्य जिवांची तस्करी करणारा अटकेत

वन्य जिवांची तस्करी करणारा अटकेत

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली. बँकॉक येथून आलेल्या प्रवाशाला सीमा शुल्क विभागाने अटक करून त्याच्या बॅगेतून दुर्मिळ वन्यजीव जप्त केले. अटक आरोपी हा आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वन्यजिवांच्या तस्करीचे प्रकार होऊ नयेत याची खबरदारी सीमा शुल्क विभागाने घेतली आहे. बँकॉक येथून एक जण दुर्मिळ वन्यजीव घेऊन येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. अटक प्रवासी विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केली. त्या बॅगेत दुर्मिळ वन्यजीव आढळून आले. चाको गोल्डन नी टॅरंटुला (१), टॅरंटुला (ब्राचीपेल्मा प्रजाती) (१), इगुआना (इगुआना प्रजाती) (८० ५० जिवंत, ३० मृत), ल्युसिस्टिक शुगर ग्लायडर्स (६, फायर टेलेड सनबर्ड (१ मृत)), पर्पल थ्रोटेड सनबर्ड (१ मृत), क्रेस्टेड फिंचबिल पक्षी (२), मधुर अस्वल (पोटोस फ्लेव्हस) (१), ब्राझिलियन चेरी हेड कासव (२) आदी पंचनामा करून जप्त केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;