Jalna News – बहिणीच्या लग्नापूर्वीच दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
जालना शहरातील मोती तलावामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. 26 मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला आहे. चार दिवसांनी त्यांच्या बहिणीच लग्न होतं, त्यामुळे घरात लग्नाची गडबड सुरू होती. परंतु भावांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जुना जालना भागातील शेर सवारनगरातील जुनेद असेफ सय्यद (19) आणि आयान आसिफ सय्यद (15) हे दोघेही स्कूटीवर आपल्या मामासह नातेवाईकांसोबत मोती तलाव परिसरामध्ये आले होते. यावेळी त्यांना पाण्यात उतरण्याचा मोह झाला आणि दोघही पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज ना आल्यामुळे काही क्षणातच दोघेही पाण्यात बुडाले. कुटुंबीयांना तात्काळ घटनेची माहिती चंदनझिरा पोलिसांना व अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर तलावात शोधमोहिम राबवण्यात आली. तब्बल दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे जुना जालना भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बहिणीच चार दिवसांनी लग्न येऊन ठेपलं होतं. त्यातच ही दुर्देवी घटना घडल्यामुळे सय्यद कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून जिल्हा सामान्य घाटी रुग्णालयात पाठवले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List