सोनमनेच केली पतीची हत्या, शिलाँग पोलिसांनी घेतले ताब्यात

सोनमनेच केली पतीची हत्या, शिलाँग पोलिसांनी घेतले ताब्यात

इंदूरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांची हत्या पत्नी सोनमनेच केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सोनमसह 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरा सोनम उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील ढाब्यावर पोहोचली होती. ढाबा चालकानेच पोलिसांना याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाच आरोपींना मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या वेळी टाकलेल्या छाप्यात अटक करण्यात आली. यात मध्य प्रदेशातील बिना येथील आनंद, राज कुशवाह, विशाल चौहान आणि इंदूर येथील आकाश राजपूत आणि उत्तर प्रदेशातील ललितपूरच्या आकाश लोधी यांचा समावेश आहे. शवविच्छेदन अहवालात राजा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे समोर आले. त्यांच्या डोक्यावर दोन जखमा होत्या. मेघालयातील शिलाँग येथील सखी वन स्टॉप सेंटरमध्ये पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतले. दरम्यान, आमची मुलगी निर्दोष आहे, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;