सोनसाखळी चोरांकडून दोन गुन्ह्यांचा छडा

सोनसाखळी चोरांकडून दोन गुन्ह्यांचा छडा

माटुंगा पोलिसांनी दोघा सोनसाखळी चोरांना पकडून दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. १८ मे रोजी एक महिला टिळक ब्रीजखालून दादर टीटीच्या दिशेने पायी जात असताना मागून आलेल्या चोरांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याचा तपास करत असताना माहीममध्ये राहणारा सलीम सय्यद ऊर्फ मोझेस आणि अकबर सय्यद हे दोघे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना पकडून चौकशी केली. गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून ७.६४० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली. दरम्यान, माटुंगा पोलीस ठाण्यात दाखल अन्य एका चोरीच्या गुन्ह्यात सलीमचा सहभाग निष्पन्न झाल्याने ४.३४० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हस्तगत केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;