ग्रेटा थनबर्ग यांच्यासह त्यांचे जहाज इस्रायलच्या ताब्यात, पॅलेस्टिनींसाठी मदत साहित्य घेऊन जात होते

ग्रेटा थनबर्ग यांच्यासह त्यांचे जहाज इस्रायलच्या ताब्यात, पॅलेस्टिनींसाठी मदत साहित्य घेऊन जात होते

उद्ध्वस्त गाझातील पॅलेस्टिनींसाठी विविध प्रकारचे मदत साहित्य आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारे जहाज इस्रायली सैन्याने आज ताब्यात घेतले. स्वीडीश पर्यावरण कार्यकर्त्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या ग्रेटा थनबर्ग आणि इतर सामाजिक कार्यकर्ते हे जहाज घेऊन जात होते. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. इस्रायली सैनिकांनी गाझापासून 200 किलोमीटर अंतरावर जहाजाचे अपहरण केल्याचा आरोप ग्रेटा थनबर्ग यांनी एका व्हिडीओद्वारे केला आहे.

आज पहाटे 5 इस्रायली स्पीड बोटींनी जहाजाला वेढा दिला आणि जहाजावर चढून संपूर्ण जहाज आणि ग्रेटा थनबर्ग तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मॅडेलीन नावाच्या या जहाजात एकूण 12 जण असून हे जहाज गाझाकडे नेण्याऐवजी इस्रायलकडे वळवण्यात आल्याचे वृत्त आहे. गाझातील लोकांसाठी औषधे, धान्य, मुलांसाठी दूध, डायपर, पाणी शुद्ध करणारे यंत्र तसेच इतर जीवनावश्यक वस्तू ग्रेटा आणि इतर सामाजिक कार्यकर्ते घेऊन जात होते. दरम्यान, 1 जून रोजी थनबर्ग आपल्या टीमसह इटलीच्या सिसीली बेटावरून निघाल्या. जर थोडीतरी मानवता शिल्लक असेल तर आपल्याला पॅलेस्टाईनबद्दल बोलले पाहिजे, असे विधान थनबर्ग यांनी मदत घेऊन निघताना केले होते.

इस्रायलने काय म्हटले?

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवरून आपली भूमिका मांडली आहे. थनबर्ग आणि त्यांच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट केलेला सेल्फी इस्रायलच्या समुद्रात सुखरूप पोहोचल्याचा आहे. सर्व सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या देशात परत जातील आणि सर्व मदत गाझापट्टीत खाडीमार्गे पोहोचवण्यात येईल असे इस्रायलने म्हटले आहे. जहाज सोमवारी दुपारपर्यंत इस्रायलच्या समुद्रातच होते. लवकरच ते अशदोद बंदरावर पोहोचेल, असे लेफ्टनंट कर्नल नदाव शोशनी यांनी स्पष्ट केले.

2 मार्चपासून गाझात मदत पोहोचवण्यावर पूर्ण बंदी

इस्रायलने 2 मार्चपासून गाझामध्ये मदत साहित्य पोहोचवण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे तेथील तब्बल 2.3 दशलक्ष लोकांपैकी 93 टक्के लोक उपासमारीचा सामना करत आहेत. तर डझनभर मुले उपासमारीने मरण पावली आहेत. मॅडेलिन जहाज या लोकांना मदत पोहोचवण्यासाठी निघाले होते. फ्रीडम फ्लोटिला नावाच्या संस्थेने हा उपक्रम सुरू केला होता. यापूर्वी याच संस्थेने गाझात मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ग्रेटा आणि त्यांची टीम इस्रायली नाकेबंदीविरोधात सातत्याने आवाज उठवत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;