अमेरिकेत रस्त्यावर आगडोंब; शेकडो गाडय़ा पेटवल्या, बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधातील कारवाईविरोधात सलग तिसऱ्या दिवशी संताप

अमेरिकेत रस्त्यावर आगडोंब; शेकडो गाडय़ा पेटवल्या, बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधातील कारवाईविरोधात सलग तिसऱ्या दिवशी संताप

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधातील कारवाईविरोधात हजारो आंदोलक रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू आहे. रविवारपासून या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी रस्तोरस्ती मोठय़ा प्रमाणावर जाळपोळ केली. शेकडो गाडय़ा पेटवून दिल्या. आंदोलन चिघळू नये म्हणून ट्रम्प यांनी तैनात केलेल्या शेकडो नॅशनल गार्डस्नी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांडय़ा आणि रबरी गोळ्या झाडल्या.

अनेक आंदोलक अमेरिकेच्या ध्वजावर थुंकताना आणि ध्वज जाळताना दिसले. लॉस एंजेलिस शहरातील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरच्या बाहेर आंदोलकांनी हजारोंच्या संख्येने जमून ट्रम्प यांच्या विरोधात  शेम…शेम… घरी जा अशा घोषणा दिल्या. ट्रम्प यांनी आंदोलनानंतर शहर बेकायदेशीर स्थलांतरितांनी व्यापले असून ते लवकरच मुक्त केले जाईल अशी पोस्ट एक्सवरून केली. दरम्यान, आंदोलनाची व्याप्ती वाढू नये यासाठी महत्त्वाचे मुक्तमार्ग बंद ठेवण्यात आले असून वाहतूक इतरत्र वळवण्यात आल्याचे वृत्त आहे. रविवारी सकाळीही आंदोलन भडकले. अनेक सरकारी इमारती आणि वाहनांवर स्प्रे-पेंटने घोषणा लिहिण्यात आल्या. एका स्ट्रिप मॉलला आग लावण्यात आली तसेच अनेक दुकानांची तोडपह्ड करण्यात आली.

रोज तीन हजार स्थलांतरितांना अटक करण्याचे लक्ष्य

ट्रम्प यांच्या हद्दपारी धोरणांतर्गत रोज तीन हजार स्थलांतरितांना अटक करण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. काही व्यावसायिकांकडून बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी धाडी टाकण्यात येत असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. रोज सुमारे एक हजार 600 बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडले जात आहेत, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

नॅशनल गार्डस्च्या 300 तुकडय़ा तैनात

ट्रम्प यांनी लॉल एंजेलिसमधील परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी नॅशनल गार्डस्च्या 300 तुकडय़ा पाठवल्या आहेत, परंतु पॅलिपहर्नियाचे महापौर करेन बास यांनी नॅशनल गार्डस्ना पाठवण्यास विरोध केला आहे. राज्यपालांच्या परवानगीशिवाय एखाद्या राज्याच्या राष्ट्रीय रक्षकांना पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, 6 आणि 7 जून रोजी ट्रम्प सरकारने लॉस एंजेलिसमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात मोहीम अधिक तीव्र केली आहे. याला मोठय़ा प्रमाणावर विरोध होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;