Mumbai News – जे जे रुग्णालयाच्या वसतिगृहात एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने जीवन संपवले

Mumbai News – जे जे रुग्णालयाच्या वसतिगृहात एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने जीवन संपवले

सर जे जे रुग्णालयातील वसतिगृहात आर्थिक आणि शैक्षणिक तणावातून एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. रोहन रामफेर प्रजापती (22) आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली असून याप्रकरणी जे जे मार्ग पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रोहन प्रजापती एमबीबीएसच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता. तो सर जे.जे. रुग्णालयाच्या आवारात असलेल्या अपना बॉईज हॉस्टेलच्या खोली क्रमांक 198 मध्ये राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्याच्या खोलीतील छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने जे.जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

रोहनच्या कुटुंबात सुरू असलेल्या आर्थिक अडचणी आणि अभ्यासाशी संबंधित दबावामुळे त्याने आपले जीवन संपवले असावे, अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासात व्यक्त केला आहे. पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत. तसेच रोहनच्या मित्रांचेही जबाब नोंदवत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;