सावधान.. आकडा वाढला; ठाण्यात कोरोनाचे 30 रुग्ण

सावधान.. आकडा वाढला; ठाण्यात कोरोनाचे 30 रुग्ण

राक्षसी कोरोनाने पुन्हा हातपाय पसरले असून आज ठाण्यात 11 नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या ठाण्यात 30 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यातील सात जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने योग्य ती काळजी घ्या असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाण्यातदेखील कोरोनाने हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यातच शनिवारी मुंब्रातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे आरोग्य विभागदेखील सतर्क झाला आहे. ठाणे शहरात आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाच्या 30 रुग्णांपैकी 22 जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. तर सात रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील सहा जणांवर ठाण्याच्या खासगी रुग्णालयात तर एका रुग्णावर महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरणाच्या यंत्रणा सज्ज
ठाण्यात 21 मे रोजी तीन, 22 मे चार आणि 23 मे तीन, 24 मे 9 तर 25 मे रोजी तब्बल 11 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 खाटांचे तर कळवा रुग्णालयात 19 खाटांचा विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला आहे. डॉक्टर, परिचारिका आणि सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्तीही करण्यात आली आहे. रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा पुरवण्यात येणार आहे.

रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या नागरिकांनी अधिक | काळजी घ्यावी. तसेच ज्यांना मधुमेह, उच्च उच्च रक्तदाब, इतर व्याधी आहेत त्यांना लागण होण्याची शक्यता जास्त असून त्यांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. – डॉ. अनिरुद्ध माळगावकर (अधीक्षक, कळवा रुग्णालय)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमेरिकेतील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचं वाढलं टेन्शन, ट्रम्प प्रशासनाने जारी केला नवा फर्मान अमेरिकेतील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचं वाढलं टेन्शन, ट्रम्प प्रशासनाने जारी केला नवा फर्मान
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने पुन्हा एकदा हिंदुस्तानी आणि परदेशी विद्यार्थ्यांचा टेन्शन वाढवणारा आदेश जारी केला आहे. यापुढे विद्यार्थ्यांनी क्लास बंक केल्यास...
निवासी उपजिल्हाधिकार्‍यासह महसूल सहायकास 5 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
‘इंडियन्सच्या ईमेलला उत्तर देत नाहीत’, न्यूझीलंडच्या मंत्रीचे वादग्रस्त वक्तव्य
IMD Monsoon Update : जूनमध्ये पावसाचं प्रमाण कसं असणार? आयएमडीचा नवा अंदाज समोर
IPL 2025 – जितेश शर्माच्या वादळात लखनऊचा धुव्वा; विराटनेही फोडून काढलं, RCB चा 6 विकेटने दणदणीत विजय
Video ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री सन्मान प्रदान
Photo – पांढऱ्या कॉर्डसेटमध्ये नुशरतच्या दिलखेच अदा