दोन वर्षांत हिंदुस्थानातील रस्ते अमेरिकेसारखे होतील
येत्या दोन वर्षांत हिंदुस्थानातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीचे होतील असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. आज एएनआयए या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रस्त्यांच्या कामाचा मास्टर प्लॅनच उलगडून दाखवला.
गडकरी म्हणाले, प्रश्न फेसलिफ्टचा नाही, ते आधीच बदलले आहे. तुम्ही आताच न्यूज रील पाहिली, मुख्य सिनेमा तर अजून सुरू व्हायचा आहे. पाईपलाईनमध्ये असलेले प्रकल्प वेगाने पुढे जात आहेत. पुढच्या दोन वर्षांत हिंदुस्थानातील रस्त्यांच्या पायाभूत सुविधा अमेरिकेसारख्या असतील, असे गडकरी म्हणाले. अमेरिकेतील काही लोक मला भेटले आणि म्हणाले की, आपल्या पायाभूत सुविधा या अमेरिकेपेक्षा चांगल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच भविष्यातील प्रकल्पांबद्दलही त्यांनी सांगितले. 25 ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसचे, एक 3 हजार किमीचा पोर्ट कनेक्टिव्हिटी हायवे आणि धार्मिक पर्यटन सर्किट्सना जोडणाऱ्या 1 लाख कोटी रुपये किमतीच्या रस्त्यांचे काम सुरू आहे, असे सांगतानाच बौद्धिष्ट सर्किट्स आणि चारधाम यांना ऑल-वेदर रस्त्यांनी जोडणाबद्दलही त्यांनी स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List