सांगली पालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना अटक, लाच मागितल्याने कारवाई

सांगली पालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना अटक, लाच मागितल्याने कारवाई

इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी सात लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली मनपाचे उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.  विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर पथकाने साबळे यांच्या घरावर छापा टाकून झाडाझडती घेतल्याची माहिती आहे. या तक्रारीत महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांचेही नाव असल्याची चर्चा आहे.

तक्रारदारांच्या कंपनीमार्फत शहरातील एका परिसरात 24 मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव होता. बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी साबळे यांनी दहा लाखांची मागणी केली होती. तडजोडीनंतर सात लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर वैभव साबळे यांनी लाचेची रक्कम मात्र स्वीकारली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईतील लोकल दुर्घटनेतील बळी, हे बुलेट ट्रेनचे बळी आहेत; संजय राऊत यांची टीका मुंबईतील लोकल दुर्घटनेतील बळी, हे बुलेट ट्रेनचे बळी आहेत; संजय राऊत यांची टीका
सामान्य मुंबईकर बुलेट ट्रेन, एसी ट्रेनने प्रवास करत नाही. सामान्य मुंबईकर लोकल ट्रेनने प्रवास करतात. मात्र, काही मूठभर धनिकांसाठी एसी...
ट्रम्प यांना प्रत्युत्तर देण्याची हिंमत मोदी, शहा यांच्यात नाही; संजय राऊत यांचा निशाणा
देशात आढळले कोरोनाचे 358 रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजारच्या वर
अजित पवार गट, मिंधे गट हे फक्त बुडबुडे, ते लवकरच फुटतील; संजय राऊत यांचा घणाघात
अमेरिकेकडून हिंदुस्थानीला अपमानास्पद वागणूक, केंद्र सरकारची बघ्याची भूमिका
लुधियानामधील चोकोबारमध्ये सापडली मेलेली पाल, 7 वर्षांचा मुलगा रुग्णालयात दाखल
ऑपरेशन सिंदूरदरम्यान झालेल्या नुकसानग्रस्त घरांना 25 कोटी रुपयांची मदत, केंद्र सरकारची घोषणा