मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर महागाई वाढली, महामार्ग बंद केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा

मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर महागाई वाढली, महामार्ग बंद केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा

मणिपूरमध्ये अरम्बाई टेंगोल या मैतेई संघटनेचे नेते करन सिंह यांना 2023 मध्ये हिंसाचार भडकवण्याच्या आरोपाखाली आज सीबीआयने अटक केली. त्यानंतर उफाळून आलेल्या हिंसाचारानंतर मणिपूरमध्ये महागाई प्रचंड वाढल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय महामार्ग बंद केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे. दरम्यान, सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे. s महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे  महागाईचा सामना करावा लागत आहे. चुराचंदपुर आणि  इम्फाळमध्ये अन्नधान्य आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

मणिपूरमध्ये प्रतिबंधात्मक आदेशानंतर रात्रभर हिंसाचार

मैतेई संघटनेचे नेते करन सिंह यांच्यासह पाच जणांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर उफाळून आलेला हिंसाचार रविवारी रात्रभर सुरुच होता. सरकारने पाच जिह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्यानंतर जमाव आणखी आक्रमक झाला आणि सरकारी इमारत पेटवून दिली.क्वाकेथल येथे सुरक्षा दलाचे जवान आणि आंदोलक यांच्यात चकमक उडाली. जमाव आणखी आक्रमक होऊ नये यासाठी सुरक्षा दल आणि पोलिसांनी अश्रुधुराच्या अनेक नळकांडय़ा फोडल्या तसेच रबराच्या बुलेट्सचा आंदोलकांवर मारा केला.

अटक केलेला मैतेई नेता माजी हेड कॉन्स्टेबल

अटक करण्यात आलेला मैतेई नेता आशेम कानन सिंह हा मणिपुर पोलिसात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. परंतु, मार्च 2025 मध्ये त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. असा दावा मणिपूर पोलिसांनी केला आहे. त्याच्यावर गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप होता. शस्त्रास्त्रांची तस्करीही तो करत होता. कानन सिंह अरमबाई टेंगोल या मैतेई संघटनेचा सदस्य आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हार्बर रेल्वे विस्कळीत, नेरुळ जवळ लेडिज स्पेशल ट्रेनेमध्ये तांत्रिक बिघाड हार्बर रेल्वे विस्कळीत, नेरुळ जवळ लेडिज स्पेशल ट्रेनेमध्ये तांत्रिक बिघाड
नेरुळ जवळ लेडिज स्पेशल ट्रेनचा तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे हार्बरची रेल्वे विस्कळी झाली आहे. गेली अर्धा ते पाऊण तास...
3 गुप्तचर विमानांसाठी मोजणार 10 हजार कोटी; आय-स्टार विमानाचा प्रस्ताव तयार, लवकरच मंजुरीसाठी मांडणार
कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा दिसणार सिद्धू
इराणमध्ये कुत्र्यांना घेऊन फिरण्यास बंदी
Sleeping Tips- रात्री शांत झोप येण्यासाठी, या 5 टिप्स फॉलो करा
शेअर बाजार उसळला, गुंतवणूकदारांची चांदी
कामाची बात! आयटीआर भरताना चुका टाळा