तब्बल 15 वर्षांनी सोलापूर विमानतळावरून सेवा सुरू!
गेल्या 15 वर्षांपासून अडथळय़ांच्या चक्रव्यूहात अडकलेली सोलापूरची विमान सेवा आजपासून सुरू झाली. पेंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला.
सोलापुरातील विमान सेवा 2010 पासून बंद होती. राजकीय दबावातून विमान सेवेसाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत असल्याचे कारण देत ती पाडण्यात आली. याचा फटका भाजपला सोलापूर आणि माढा लोकसभा निवडणुकीमध्ये बसला. त्यानंतर मात्र भाजपने विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा पुढे करीत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते विमानतळ सुशोभीकरणाचे उद्घाटन झाले. त्यानंतर आज विमानसेवेला सुरुवात झाली.
आमदार-खासदाराचे कार्यक्रमातून ‘वॉकआऊट’
विमान सेवा उद्घाटन सोहळा सुरू असताना भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील अचानक व्यासपीठावरून एकापाठोपाठ निघून गेल्याने भाजपमधील गटबाजीची चर्चा रंगली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List