गोव्यात मेडिकल लोच्या, आरोग्यमंत्र्यांनी मागितली डॉक्टरांची माफी

गोव्यात मेडिकल लोच्या, आरोग्यमंत्र्यांनी मागितली डॉक्टरांची माफी

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरांना सर्वांसमोर झापल्याबद्दल माफी मागितली तसेच त्यांचे निलंबनही मागे घेतले. मी त्या क्षणी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्याबद्दल मला खूप वाईट वाटते असे त्यांनी एक्सवरून म्हटले आहे.

राणे यांनी  7 जानेवारीला रुग्णालयात जाऊन अचानक तेथील स्थितीचा आढावा घेतला. यावेळी डय़ुटीवर तैनात असलेल्या डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्यावर रुग्णांशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला आणि सर्वांसमोर फटकारले होते. तसेच त्यांना निलंबित करण्याचेही आदेश दिले होते. राणे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी झाल्या प्रकाराबद्दल चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांना त्यांनी डॉक्टरांसोबत केलेल्या वर्तनावरून चांगलेच झापले. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टर कुट्टीकर यांची माफी मागितल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिथे झापले तिथे येऊन माफी मागा

आरोग्यमंत्र्यांनी मागितलेली माफी डॉ. कुट्टीकर यांनी मात्र नाकारली आहे. पॅडयुअल्टी विभागात ज्या ठिकाणी मंत्र्यांनी त्यांना फटकारले होते त्याच ठिकाणी त्यांनी 24 तासांच्या आत येऊन जाहीरपणे माफी मागावी अशी मागणीही डॉक्टरांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;