फडणवीस सरकारची हुकूमशाही, शासनाच्या निर्णयांवर टीका करण्यास कर्मचाऱ्यांना बंदी

फडणवीस सरकारची हुकूमशाही, शासनाच्या निर्णयांवर टीका करण्यास कर्मचाऱ्यांना बंदी

सरकारच्या निर्णयांवर मत व्यक्त करण्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे. कर्मचाऱयांनी सोशल मीडिया वा अन्य माध्यमांतून सरकारी निर्णयांवर मत मांडले किंवा आक्षेप घेतला तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल अशी सूचनावजा धमकी राज्य शासनाच्या अभियोग संचालनालयाने दिली आहे. ही हुकूमशाही असल्याची प्रतिक्रिया सरकारी कर्मचाऱयांमध्ये उमटली आहे.

राज्यघटनेने देशातील नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, परंतु भारतीय जनता पक्ष देशात आणि राज्यात सत्ताधारी बनल्यापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. शासनाच्या अभियोग संचालनालयाचे संचालक अशोककुमार भिल्लारे यांनी नुकतेच एक परिपत्रक जारी केले असून त्यात कर्मचाऱयांना सरकारविरुद्ध बोलण्यास बंदी घालणारे स्पष्ट आदेश दिले आहेत.

अभियोग संचालनालयाचा फतवा

शासनाच्या धोरणात्मक निर्णयांवर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांवर फेसबुक, यूटय़ूब, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटस्अॅप, लिंक्डइन यांसारख्या सोशल मीडियावर संचालनालयातील कर्मचारी मत, टीका अथवा आक्षेप नोंदवत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 शी विसंगत असून त्यांनी शासकीय कामकाजामध्ये सचोटी, कर्तव्यपरायणता इत्यादी राखण्यासंबंधीच्या त्यांच्या कर्तव्यांमध्ये बाधा आणणारी आहे. त्यामुळे अशी कृती करणाऱ्या कर्मचाऱयांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे भिल्लारे यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

शिस्तीच्या नावाखाली आवाज दाबला जातोय – हर्षवर्धन सपकाळ

सरकारने वाट्टेल ते करायचे, भ्रष्टाचार आणि लूट करायची पण त्याविरोधात कुणी बोलायचे नाही ही महायुती सरकारची दडपशाही आहे, शिस्तीच्या नावाखाली आवाज दाबला जातोय, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. लोकशाही केवळ मतदानात नाही तर मत मांडण्यातही असते, असे सपकाळ म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;