‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतून ‘मिस इंग्लंड’ पडली बाहेर

‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतून ‘मिस इंग्लंड’ पडली बाहेर

यंदाची ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा हैदराबाद येथे पार पडत आहे. स्पर्धेची अंतिम फेरी 31 मे रोजी होणार आहे. अशातच ‘मिस इंग्लंड’ मिला मॅगी स्पर्धेतून निघून गेली आहे. मॅगीची जागा मिस इंग्लंडची उपविजेती शार्लोट ग्रँटने घेतली आहे. स्पर्धेबाहेर पडताना मॅगीने ‘मिस वर्ल्ड’च्या आयोजकांवर गंभीर आरोप केले. यामुळे वाद निर्माण झाला. यानंतर ‘मिस वर्ल्ड’च्या आयोजकांनी निवेदन जारी करत मॅगीच्या आईची तब्बेत बिघडल्याने तिने स्पर्धा सोडल्याचे सांगितले.

‘मिस वर्ल्ड’च्या फायनान्सर्सशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप मॅगीने केला. ‘मिस वर्ल्ड’च्या सीईओ ज्युलिया मोर्ले यांनी मॅगीचे आरोप फेटाळून लावत शनिवारी अधिकृत निवेदन जारी केले. जुलीया म्हणाल्या, दुर्दैवाने आम्हाला कळले आहे की, ब्रिटनच्या माध्यमांनी खोट्या आणि बदनामीकारक बातम्या प्रकाशित केल्या आहेत. हे दावे पूर्णपणे खोटे आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;