मी सरकारला सांगूनच देश सोडला! विजय मल्ल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

मी सरकारला सांगूनच देश सोडला! विजय मल्ल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

मी चोर नाही, पळपुटा तर नाहीच नाही. मी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली यांना सांगूनच देश सोडला होता, असा खळबळजनक गौप्यस्पह्ट फरार मद्य उद्योजक विजय मल्ल्या याने केला आहे.

नऊ वर्षांनंतर प्रथमच माध्यमांसमोर आलेल्या मल्या याने यूटयुबर राज शमानी याच्या पॉडकास्टला दिलेल्या चार तासांच्या मुलाखतीत आपले जीवन, व्यवसाय, किंगफिशर एअरलाइन्सचे अपयश, कर्मचा-यांचे थकीत पगार आणि कायदेशीर लढाई यावर सविस्तर चर्चा केली. मल्ल्याने हिंदुस्थानी बँकांकडून 6200 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, ते कर्ज न फेडताच ते इंग्लंडला पळून गेले. त्यांच्याविरोधात फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्यावर केंद्रातील भाजप सरकारने त्यांना फरारी घोषित केले होते. दरम्यान, मी कायदेशीर लढा देत आहे. माझ्यावरील सुनावणी निपक्षःपातीपणे होईल, असे मला वाटले तर तर मी देशातही परतण्याचा विचार करेन. जर माझ्या नशिबात तुरुंगात जाणे असेल, तर त्यासाठीही मी तयार आहे, असेही मल्ल्या म्हणाला.

मी चोर नाही, बँकांनी माझ्याकडून दुप्पट वसुली केली!

मल्ल्या म्हणाला, मला चोर म्हणणेही चुकीचे आहे. कारण ज्या बँकांकडून मी कर्ज घेतले होते त्या 6200 कोटींच्या बदल्यात बँकांनी माझ्याकडून दुप्पट म्हणजे 14 हजार कोटी वसूल केले आहेत. बँकांसोबत सेटलमेंट करण्याचा विचार करत असतानाच माझा पासपोर्ट रद्द झाला आणि परदेशात अडकून पडलो, असा दावाही मल्ल्याने केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;