इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीची लवकरच अंमलबजावणी करणार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कार्यवाहीला वेग

इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीची लवकरच अंमलबजावणी करणार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कार्यवाहीला वेग

इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी जाहीर करणाऱ्या शासन निर्णयाची (जीआर) लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. जीआर काढून अनेक दिवस उलटले तरी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर इलेक्ट्रिक वाहनांकडून टोलवसुली सुरू असल्याचे वृत्त दै. ‘सामना’ने 31 मे रोजीच्या अंकात ‘महायुती सरकारची ‘टोल’वाटोलवी, फसवाफसवी’ या मथळय़ाखाली प्रसिद्ध केले. त्या वृत्ताच्या दणक्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने टोलमाफी प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी कार्यवाहीला वेग दिला आहे.

सरकारने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी देणारा जीआर 23 मे रोजी जारी केला. त्यानुसार इलेक्ट्रिक वाहनांना तिन्ही मार्गांवर तातडीने पूर्ण टोलमाफी देणे अपेक्षित आहे. असे असताना अनेक टोलनाक्यांवर अद्याप इलेक्ट्रिक वाहनांकडून बिनदिक्कतपणे टोलवसुली केली जात आहे.

विविध प्राधिकरणांची तातडीने बोलावली बैठक

इलेक्ट्रिक वाहनांकडून टोलच्या माध्यमातून लूट सुरूच असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीने विविध प्राधिकरणांची बैठक बोलवण्यात आली. परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अधिकारी, एनपीसीआयचे प्रतिनिधी, सिस्टम इंटिग्रेटर, बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच महामार्ग प्राधिकरणासोबत बैठक घेऊन टोलमाफी प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मलायका अरोरा तिच्या दिवसाची सुरुवात एक चमचा ‘हा’ पदार्थ खाऊन करते; फिटनेसचं खरं सिक्रेट मलायका अरोरा तिच्या दिवसाची सुरुवात एक चमचा ‘हा’ पदार्थ खाऊन करते; फिटनेसचं खरं सिक्रेट
आजकाल लोक तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक गोष्टी करून पाहतात. काही लोक व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जातात, तर काही घरगुती उपाय करून पाहतात....
नाश्त्यात ‘हा’ पांढरा पदार्थ खाल्ल्याने लिव्हर खराब होऊ शकते, तुम्ही ते खाण्याची चूक करत आहात का?
Sindhudurg News – कणकवली रेल्वे स्थानकातील छताच्या सिलिंगचा काही भाग कोसळला; कमाचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, शिवसेनेची मागणी
Megablock – रविवारी चाकरमान्यांचे ‘मेगा’ हाल! देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तिन्ही मार्गावर ब्लॉक
ज्या भ्रष्टाचाराची माहिती मी पंतप्रधानांना दिली होती, त्याच भ्रष्टाचारात मला गोवलं – सत्यपाल मलिक
दहशतवादी मसूद अझहरच्या कुरापती, कश्मीरनंतर आता म्यानमारमध्ये उभारतोय जिहादी नेटवर्क
सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, शिमलामधील आयजीएमसी रुग्णालयात दाखल