तोंडावर लघवी केली, व्हायरसचं इंजेक्शन दिलं! भाजप आमदारावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल
कर्नाटकमधील भाजप आमदार मुनीरत्न नायडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 40 वर्षीय महिलेने मुनीरत्न यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. आमदाराने आपल्या तोंडावर लघवी करून प्राणघातक व्हायरसचे इंजेक्शन दिले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी आरएमसी यार्ड पोलीस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून भाजप आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. सदर घटना 11 जून 2023 रोजी मथिकेरे येथील आमदाराच्या कार्यालयात घडली. या आमदाराच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याच कारमधून पीडित महिलेला आमदाराच्या कार्यालयात गेले.
झाडाखाली झोपला… वरून महापालिकेने गाळ टाकला… एकाचा जागीच मृत्यू
जीवे मारण्याची दिली होती धमकी
कार्यालयात पोहोचल्यानंतर आमदाराने त्याच्या दोन साथीदारांसह महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्या नराधमांनी तिचे कपडे काढले. यावेळी तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. मुनीरत्नने दोन पुरुषांना महिलेवर बलात्कार करण्याचे आदेश दिले होते. यानंतर आमदाराने आपल्या तोंडावर लघवी केली, असे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान या महिलेने आमदारावर धोकादायक वायरसचे इंजेक्शन दिल्याचाही आरोप केला आहे. महिलेने सांगितले की, घटनेदरम्यान एका पुरूषाने खोलीत प्रवेश केला आणि आमदाराला एक पांढरा बॉक्स दिला. त्याने बॉक्समधून एक सिरिंज काढली आणि मला इंजेक्शन दिले होते. यावेळीही आमदाराने महिलेला धमकी दिली होती. जर याबाबात कोणालाही जराही खबर लागली तर तुझ्या कुटुंबाला सोडणार नाही. सगळ्यांना उद्ध्वस्त करेन, अशी धमकी आमदाराने दिली होती.
महिलेवर झालेल्या अत्याचाराला दोन वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, या वर्षी जानेवारीमध्ये महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तिला भयंकर विषाणूची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान, या प्रकरणात आरोपी भाजप आमदार मुनीरत्न यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आमदार आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चौथ्या आरोपीची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून त्या आरोपीचा शोध सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List