बॉलीवूडचे जम्पिंग जॅक जितेंद्र यांनी कमावले 855 कोटी

बॉलीवूडचे जम्पिंग जॅक जितेंद्र यांनी कमावले 855 कोटी

‘बॉलीवूडचे जम्पिंग जॅक’ अशी ओळख असलेले दिग्गज अभिनेते जितेंद्र यांनी आपली अंधेरीतील जमीन तब्बल 855 कोटी रुपयांना विकली आहे. पूर्वी नेटमॅजिक आयटी सर्व्हिसेस म्हणून ओळखल्या जाणाऱया एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्सने ही जमीन खरेदी केली आहे. या करारावर 8.69 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरल्याचे समोर आले आहे.

एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स आणि क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही पंपनी क्लाऊड सोल्यूशन्स, होस्टिंग, डेटा मॅनेजमेंट, सायबर सुरक्षा आणि ऑप्लिकेशन डेव्हलपमेंट यासारख्या विविध तंत्रज्ञान सेवा पुरवते. स्क्वेअर यार्ड्सवरील मालमत्तेच्या नोंदणी कागदपत्रांनुसार, अभिनेते जितेंद्र यांच्या पॅन्थियन बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि तुषार इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांच्या माध्यमातून हा करार करण्यात आला आहे. 29 मे रोजी हा करार रजिस्टर झाला होता आणि त्यात 9,664.68 चौरस मीटर म्हणजे सुमारे 2.39 एकरच्या दोन लगतच्या जमिनींचा समावेश आहे. या जमिनीवर सध्या बालाजी आयटी पार्क आहे, ज्यामध्ये तीन इमारती आहेत आणि एकूण बिल्टअप क्षेत्रफळ 4.9 लाख चौरस फूट आहे.

गुंतवणुकीसाठी अंधेरीला प्राधान्य

बॉलीवूडचे अनेक कलाकार गुंतवणुकीसाठी अंधेरीला प्राधान्य देतात. एप्रिलमध्ये गायिका अलका याज्ञिक व त्यांची मुलगी सायेशा यांनी 11.5 कोटी रुपये मोजून अंधेरीत एक लक्झरी अपार्टमेंट घेतले. मे महिन्यात अभिनेता जयदीप अहलावत व त्याची पत्नी ज्योती हुड्डा यांनी मुंबईतील अंधेरी भागात 10 कोटी रुपयांमध्ये अपार्टमेंट विकत घेतले होते. मागच्या वर्षी बिग बी यांनी अंधेरी भागात तीन व्यावसायिक मालमत्तांची खरेदी केली. 60 कोटी रुपयांना हा व्यवहार झाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;