टेस्लाच्या सीएफओला 11,95,20,06,911 रुपये पगार, वैभव तनेजा यांनी सत्या नाडेला आणि सुंदर पिचाई यांना टाकले मागे

टेस्लाच्या सीएफओला 11,95,20,06,911 रुपये पगार, वैभव तनेजा यांनी सत्या नाडेला आणि सुंदर पिचाई यांना टाकले मागे

टेस्ला कंपनीत सीएफओ म्हणून कार्यरत असलेले मूळचे हिंदुस्थानी वैभव तनेजा सध्या भरमसाट मिळणाऱ्या पगारावरून चर्चेत आले आहेत. वैभव तनेजा हे जगातील सर्वात जास्त पगार मिळवणारे सीएफओ बनले आहेत. 2024 मध्ये तनेजा यांना 139.5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 11,95,20,06,911 रुपये पगार मिळाला आहे. त्यांचा हा पगार मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यापेक्षा जास्त आहे.

गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने 2024 मध्ये सुंदर पिचाई यांना 10.73 मिलियन डॉलर्स पगार दिला आहे, तर मायक्रोसॉफ्टने नाडेला यांना 79.1 मिलियन डॉलर पगार दिला आहे. वैभव तनेजा यांची बेसिक सॅलरी 400,000 डॉलर आहे, परंतु स्टॉक ऑप्शन्स आणि इक्विटी अवॉर्डस्मधून त्यांना बाकीचा पैसा मिळाला आहे. तनेजा कॉर्पोरेटमध्ये सर्वात जास्त पगार मिळवणारे फायनान्स एक्झिक्युटिव्ह बनले आहेत. वैभव तनेजा यांना 139.5 मिलियन डॉलरचे वेतन स्टॉकच्या रूपात मिळाले आहे. हे स्टॉक त्यांना चार वर्षांपर्यंत मिळणार आहे.

दिल्ली विद्यापीठातून शिक्षण

वैभव तनेजा यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. 1999 मध्ये कॉमर्समध्ये पदवी मिळाल्यानंतर त्यांनी 2000 मध्ये इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियामधून चार्टर्ड अकाऊंटची पदवी मिळवली. 2006 मध्ये अमेरिकेत सर्टिफाइड पब्लिक अकाऊंटेंटची डिग्री मिळवली. तनेजा यांनी 17 वर्षांपर्यंत हिंदुस्थान आणि अमेरिका या दोन्ही ठिकाणी काम केले आहे. 2016 मध्ये सोलरसिटी नावाच्या कंपनीत काम केले. 2017 मध्ये या कंपनीची टेस्ला कंपनीत विलीनीकरण झाल्यानंतर तनेजा टेस्लामध्ये असिस्टेंट कॉर्पोरेट कंट्रोलर बनले. 2018 मध्ये कॉर्पोरेट कंट्रोलर बनले, तर 2019 मध्ये चीफ अकाऊंट ऑफिसर बनले. 2023 मध्ये त्यांना कंपनीने सीएफओ बनवले. तनेजा हे टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालकसुद्धा आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकर आज पाहणार समुद्राचं रौद्ररूप; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईकर आज पाहणार समुद्राचं रौद्ररूप; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे,  अवकाळी पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू...
‘रात्री 8 वाजता मी दारूची बाटली उघडते अन्…’ गोविंदाची पत्नी सुनिता दारूसाठी वेडी का आहे? तिनेच सांगितलं कारण
Hair Care- केस गळतीमुळे त्रस्त आहात का? या सहा उपायांनी तुमच्या केसांना द्या नवसंजीवनी
Vaishnavi Hagavane case – राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी
Nanded News – गाडीवर पोलीस व पत्रकार बोर्ड लावून गोवंश चोरी करण्याचा प्रयत्न; सहा जणांना अटक
आरक्षित सरकारी जमीन राहू-केतूंनी हडपली! हिंमत असेल तर आव्हान स्वीकारा; अनिल गोटेंचा मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेंना इशारा
हिंदुस्थानात कोरोना रुग्णांचा आकडा चढाच! महाराष्ट्रात 100 नव्या रुग्णांची नोंद