“…हा अत्याचार उघडपणे होत असताना सगळेच गप्प राहिले”, संजय राऊत यांचं सरसंघचालकांना पत्र, पुस्तकाची प्रतही पाठवली

“…हा अत्याचार उघडपणे होत असताना सगळेच गप्प राहिले”, संजय राऊत यांचं सरसंघचालकांना पत्र, पुस्तकाची प्रतही पाठवली

ईडीने बेकायदेशीररित्या तुरुंगात टाकलेले असताना 100 दिवसात आलेल्या अनुभवांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांचे ‘नरकातील स्वर्ग’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या संपल्या आहेत. या पुस्तकाची मागणी वाढत असतानाच खुद्द संजय राऊत यांनीही राज्यातील विविध नेत्यांना आपल्या पुस्तकाची प्रत पाठवली आहे. आता संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही ही प्रत पाठवली आहे. राऊत यांनी स्वत: आपल्या अधिकृत एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली.

आदरणीय सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांना “नरकातला स्वर्ग“ची प्रत आज पाठवली. संघ परिवारातील अनेक मित्रांनी पुस्तक वाचून अभिप्राय कळवले आहेत. मी त्यांचा आभारी आहे, असे संजय राऊत यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. या पुस्तकाच्या प्रतिसोबत राऊत यांनी भागवत यांना एक पत्रही पाठवले आहे.

भाजपच्या 27 आमदारांचे फोन आले, ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक एका बैठकीत वाचलं! संजय राऊत यांच्या ट्विटची चर्चा

‘सोबत ‘नरकातला स्वर्ग’ या माझ्या पुस्तकाची प्रत आपल्या अवलोकनासाठी पाठवत आहे. देशातील लोकशाहीविरोधी राज्यकर्त्यांनी मला खोट्‌या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकले. माझा व माझ्या कुटुंबियांचा छळ केला. माझी कायदेशीर मार्गाने सुटका होऊ नये म्हणून न्याय यंत्रणेवरही दबाव आणला. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी हा अत्याचार उघडपणे होत असताना सगळेच गप्प राहिले. 1975 च्या आणीबाणी पर्वात हेच घडले व त्याविरुध्द संघ परिवाराने संघर्ष केल्याचे सांगितले जाते. माझ्या लेखनात अलीकडच्या काळातले अंधार युग चित्रित झाले आहे. आपल्याला लेखनाचा हा प्रयत्न नक्कीच आवडेल’, असे या पत्रामध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;