बाबा सिद्दीकी हत्याकांड; मुख्य आरोपी झिशान अख्तरला कॅनडा पोलिसांनी पकडल्याची चर्चा

बाबा सिद्दीकी हत्याकांड; मुख्य आरोपी झिशान अख्तरला कॅनडा पोलिसांनी पकडल्याची चर्चा

अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणातील वॉण्टेड आरोपी झिशान अख्तर याला कॅनडामध्ये पोलिसांनी पकडल्याची चर्चा आज समाज माध्यमांवर रंगली होती. मात्र या वृत्ताला मुंबई पोलिसांकडून कुठलाही दुजोरा देण्यात आला नाही.

वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी परिसरात बाबा सिद्दीकी यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता पर्यंत मुंबई गुन्हे शाखेने बऱयाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. परंतू या हत्याकांडात महत्वाची भुमिका बजावणारा झिशान अख्तर पोलिसांच्या हाती अद्याप लागलेला नाही. त्याचा थांगपत्ता लागत नसताना झिशानला कॅनडा पोलिसांनी पकडल्याचे वृत्त आज समाज माध्यमांवर पसरले. त्याला का व नेमकं कुठे पकडले याबाबत काही खुलासा करण्यात आला नव्हता. तसेच झिशानला कॅनडात पोलिसांनी पकडले याला मुंबई पोलिसांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;