पंढरपुरच्या वारीला आता नव्या तंत्रज्ञानाची साथ; नव्या पिढीसाठी एक अनोखी दिंडी AI-Dindi

पंढरपुरच्या वारीला आता नव्या तंत्रज्ञानाची साथ; नव्या पिढीसाठी एक अनोखी दिंडी AI-Dindi

अधिकाधिक लोकांना वारीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी तरुणांना आपल्या संस्कृतीची, वारकरी संप्रदायाची ओळख करून देण्यासाठी आणि वारीसारख्या आध्यात्मिक वाटेची ओळख व्हावी या दृष्टीने AI Dindi ची संकल्पना मांडण्यात आली.

जून महिना जवळ यायला लागला की वेध लागतात ते आषाढी पायी वारीचे! वारी म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नाही, तर ती एक आत्मिक शुद्धीची प्रक्रिया आहे. वारी आपल्याला साधेपणा शिकवते, त्याग शिकवते. कोणताही भेदाभेद न करता मनःशांती व समाधान कसे मिळवावे हे शिकवते.

याच वारकरी परंपरेत नवीन पिढीला आकर्षित करण्यासाठी आधुनिक दिंडीची एक अभिनव संकल्पना 18 वर्षांपूर्वी उदयास आली. IT दिंडी ह्या नावाने पालखीसोहळ्यात सहभागी होत असताना काही मर्यादा लक्षात आल्या, वारंवार काही शंकांचे निरसन करावे लागले उदा. अनेकांना वाटते की फक्त आयटी क्षेत्रातलेच लोक सहभागी होऊ शकतात का? घरातल्या अन्य व्यक्ती चालतील का? मी गृहिणी आहे अथवा निवृत्त आहे, मला सहभागी होता येईल का इत्यादी

आळंदी ते पुणे ह्या टप्प्यात पूर्वीप्रमाणेच आयटी दिंडी ह्या नावाने व्यवस्था कार्यरत राहील, पण वारीच्या पुणे ते पंढरपूर ह्या पुढील टप्प्यांसाठी आमच्या व्यवस्थेचा विस्तार करतांना आम्ही AI-दिंडी ह्या नावाने सेवा द्यायचे ठरवले.

त्यामागची भूमिका:

• All Inclusive Dindi: विविध भाषा, प्रांत, वय आणि नोकरी/व्यवसायातील लोकांना सामावून घेणारी सर्वसमावेशक दिंडी

• Artificial Intelligence चा वापर: व्यवस्थापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

• Adhyatmik Intelligence – नव्या पिढीत अध्यात्मिक जाणीव वाढवण्याचा एक प्रयत्न

• AI म्हणजे मराठीत ‘आई’ म्हणजे ‘माऊली’, भक्तांना आधार देणारी, प्रेमळ शक्ती!!! वारीमध्ये सर्वजण एकमेकांना ‘माऊली’ म्हणतात, कारण साऱ्यांमध्ये पांडुरंगाचं प्रतिबिंब पाहिलं जातं.

विज्ञानाच्या प्रगतीचे निदर्शक अशी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भागवत संप्रदायाची अध्यात्मिक शक्ती अश्या दोहोंचा संगम असणारे ‘AI-दिंडी’ हे नाव सर्वार्थाने समर्पक वाटते. AI-Dindi ही नफा नसलेली (Non-profit) संस्था असून ती विविध कंपन्यांत कार्यरत असणाऱ्या अथवा व्यावसायिक असणाऱ्या व्यक्तींद्वारा सेवाभावी वृत्तीने चालवली जाते.

वारी करण्याची अनेकांची इच्छा असते, पण –
* कुठून सुरुवात करावी? संपूर्ण वारी करणे जमणार नाही, पण अनुभव तर घ्यायचा आहे.
* राहणे, जेवण, परतीची व्यवस्था कशी करावी? सोबत मिळेल का?
अशा प्रश्नांमुळे अनेकजण सहभागी होऊ शकत नाहीत. AI -Dindi याच अडचणी सोडवते. या आधुनिक दिंडीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.aidindi.org भेट देता येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;