राजकारण करा, इव्हेंट मॅनेजमेंट नको! राहुल गांधी यांचा मोदींवर जोरदार हल्ला

राजकारण करा, इव्हेंट मॅनेजमेंट नको! राहुल गांधी यांचा मोदींवर जोरदार हल्ला

देशाची मंदावलेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशाला सामान्य नागरिकांचे हित जपणारी अर्थव्यवस्था हवी आहे, मोजक्या धनदांडग्यांसाठी राबणारी नको, असे नमूद करतानाच राजकारण करा पण इव्हेंट मॅनेंजमेंट नको, असा सणसणीत टोला राहुल गांधी यांनी मोदींना लगावला.

‘आकडे खरं बोलतात’ असे शीर्षक देत राहुल गांधी यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. त्यांनी आकडेवारीच्या माध्यमातून वस्तुस्थितीच समोर ठेवली. गेल्या वर्षी दुचाकाRच्या विक्रीत 17 टक्के आणि कारच्या विक्रीत 8.6 टक्के घट झाली आहे. मोबाईल बाजारात 7 टक्के घट झाली आहे. दुसरीकडे, खर्च आणि कर्जे दोन्ही सतत वाढत आहेत, असे राहुल गांधी यांनी नमूद केले.

एका वर्षात टू व्हीलरची विक्री 17 टक्क्यांनी घटली आणि चार चाकी वाहनांच्या खरेदीत 8.6 टक्क्यांची घट झाली. इतकेच नव्हे तर मोबाईल पह्नचे मार्पेटही 7 टक्क्यांनी घसरले.

सगळंच महागतंय

घरभाडे, घरगुती महागाई, शिक्षण खर्च, जवळजवळ सर्वकाही महाग होत आहे. हे फक्त आकडे नाहीत, तर प्रत्येक सामान्य भारतीय ज्या आर्थिक दबावाखाली आहे त्याचे वास्तव आहे. म्हणूनच आपल्याला असे राजकारण हवे आहे जे झगमगाटाशी नाही तर सामान्यांच्या दैनंदिन जीवनातील वास्तवाशी जोडलेले असेल. वस्तुस्थिती समजून घेणारे, जबाबदारीने त्याला प्रतिसाद देणारे असेल, असे राहुल म्हणाले.

फक्त मित्रांचा विकास

काँग्रेसच्या एक्स अकाउंटवरून अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाषण पोस्ट करत मोदींना लक्ष्य करण्यात आले आहे. शेतकरी आणि बेरोजगार मृत्यूला कवटाळत आहेत. महागाईने सामान्य जनतेचे पंबरडे मोडले आहे. असे असताना मोदी सरकार मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत श्रीमतांच्या विकासाची गॅरंटी देत आहे. केवळ मोदी मोदी नारे देऊन गरिबांचा विकास होणार नाही, असे खर्गे यांनी सुनावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;