अकोल्यात डीपीडीसीच्या बैठकीत शिवसेनेचा दणका, 29 कोटींचा निधी परत पाठवल्याने शिवसैनिक आक्रमक

अकोल्यात डीपीडीसीच्या बैठकीत शिवसेनेचा दणका, 29 कोटींचा निधी परत पाठवल्याने शिवसैनिक आक्रमक

अकोल्यात जिल्हा नियोजन समितीच्या म्हणजेच डीपीडीसीच्या बैठकीत मोठा राडा झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार नितीन देशमुख यांनी 29 कोटींचा निधी परत गेल्याच्या मुद्द्यावरून आवाज उठवला. यावरून वाद झाल्याने बैठकीत मोठा गोंधळ उडाला. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले.

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी 29 कोटींच्या निधीचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे बैठकीत उपस्थित भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांना हा मुद्दा झोंबला. यामुळे वाद वाढून दोन्ही आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि मोठा गोंधळ उडाला. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

मिंध्यांच्या मनमानी विरोधात नागपूरमध्ये शिवसेनेचे आंदोलन

अकोल्यात नियोजन भवन येथे ही डीपीडीसीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार नितीन देशमुख आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्यात बाचाबाची झाली. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. यावेळी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. वातारण तापल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि कार्यकर्त्यांना शांत केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;