रिल्सचा नाद नडला! के पी फॉल्सच्या जंगलात अडकली तीन अल्पवयीन मुले

रिल्सचा नाद नडला! के पी फॉल्सच्या जंगलात अडकली तीन अल्पवयीन मुले

मुंबई पुणे बोरघाटातील झेनीथ धबधब्याच्या 3 किमी अंतरावर असणाऱ्या केपी फॉल्स या धबधब्यावर मुंबई गोरेगाव येथील 3 अल्पवयीन मुले रिल्स बनविण्यासाठी आली होती. मात्र परत मागे फिरण्याचा रस्ता माहित नसल्याने जंगलात भरकटली. त्यांत अंधार पडल्याने वाट चुकले. भरकटलेल्या अल्पवयीन मुलांची खबर खोपोली पोलिसांना मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले व त्यांचे साथीदार व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अंधारात अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन दत्त मंदिर येथे आणले. या मुलांना खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले.

रोशन विश्वकर्मा रामस्वरूप (14), मन्नत केवट (14), व अभिनव वेणुगोपाल (16) अशी आहेत. या अल्पवयीन मुलांचे पालक येईपर्यंत खोपोली पोलीस स्टेशन येथे देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;