ऑरियनप्रो बुद्धिबळ स्पर्धेत जगभरातील 19 ग्रॅण्डमास्टर्स झुंजणार

ऑरियनप्रो बुद्धिबळ स्पर्धेत जगभरातील 19 ग्रॅण्डमास्टर्स झुंजणार

40 लाखांचे रोख पुरस्कार असलेल्या ऑरियनप्रो आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत जगभरातील 19 ग्रॅण्डमास्टरचा कस लागणार आहे. येत्या 16 ते 24 जूनदरम्यान कफ परेडच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ही स्पर्धा खेळविली जाणार आहे.

ही बुद्धिबळ स्पर्धा एकंदर दोन गटांत खेळविली जाणार असून यात एक खुला गट असेल, ज्यात 19 ग्रॅण्डमास्टरसह 11 आंतरराष्ट्रीय मास्टर आणि 4 महिला आंतरराष्ट्रीय मास्टर खेळणार आहेत. या गटातील विजेत्यांना रोख 25 लाखांची बक्षिसे दिली जातील दुसरा गट 13 वर्षांखालील खेळाडूंचा असून यात 15 लाखांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ही ज्युनियर खेळाडूंची जगातील सर्वाधिक रकमेची स्पर्धा ठरली आहे.

या गटात हिंदुस्थानसह परदेशातील युवा बुद्धिबळपटू 7 वर्षांखालील. 9 वर्षांखालील, 11 वर्षांखालील आणि 13 वर्षांखालील अशा चार वयोगटात भाग घेतील.

हिंदुस्थानातील सर्वाधिक रकमेच्या या स्पर्धेत अव्वल तीन विजेत्यांना अनुक्रमे 4 लाख, 3 लाख आणि दोन लाख रुपयांचे बक्षीस मिळेल. ज्युनियर स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे तीन लाख, दोन लाख आणि एक लाख रुपयांचे भव्य बक्षीस देऊन गौरविले जाणार आहे हिंदुस्थानचा ग्रॅण्डमास्टर दिप्तयन घोषला ग्रॅण्डमास्टर स्पर्धेसाठी अव्वल मानांकन देण्यात आले आहे. जॉर्जियाचा ग्रॅण्डमास्टर लेवन पंतसुलिया आणि आर्मेनियाचा ग्रॅण्डमास्टर पेट्रोस्यान मॅन्युएल यांना अनुक्रमे दुसरे आणि तिसरे मानांकन लाभले आहे. ज्युनियर स्पर्धेत सहा देशांच्या खेळाडूंचा सहभाग असून मुंबईचा 12 वर्षीय फिडेमास्टर अंश नेरुरकरला अव्वल मानांकन देण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;