चर्चगेट रेल्वे स्थानकात आग!धुराच्या लोटांमुळे प्रवासी-कर्मचाऱ्यांमध्ये घबराट; सुदैवाने जीवितहानी टळली

चर्चगेट रेल्वे स्थानकात आग!धुराच्या लोटांमुळे प्रवासी-कर्मचाऱ्यांमध्ये घबराट; सुदैवाने जीवितहानी टळली

चर्चगेट रेल्वे स्थानकावर आज ऐन सायंकाळी कामावरून घरी जाणाऱया मुंबईकरांची मोठी गर्दी असतानाच दुकानांना लागलेल्या भीषण आगीमुळे प्रवासी आणि प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली. केकच्या दुकानात आगीची ठिणगी पडल्यानंतर या ठिकाणच्या ज्वलनशील साहित्यामुळे आग आणखीनच भडकली. पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीच्या धुराचे लोट सब वेसह संपूर्ण स्थानक परिसरात पसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट उडाली. आगीमुळे काही काळासाठी रेल्वे सेवा बंद करावी लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पश्चिम रेल्वेचे अंतिम स्थानक असलेल्या चर्चगेट स्थानकावर नेहमीच मोठी रहदारी असते. तर सायंकाळच्या सुमारास कामावरून घरी जाणाऱया प्रवाशांमुळे ही गर्दी आणखी वाढते. आजही स्थानकावर अशीच गर्दी असताना सायंकाळी 5.26 वाजता माँजिनिस केकच्या दुकानात ही आग लागली. या ठिकाणच्या ज्वलनशील पदार्थांमुळे ही आग झपाटय़ाने पसरली. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीच्या सर्व मजल्यांवरील कर्मचाऱयांना इमारतीबाहेर काढण्यात आले. शिवाय सब वे बंद करून प्रवाशांनाही आगीच्या ठिकाणी जाण्यास रोखण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या 15 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे ‘सीपीआरओ’ विनित अभिषेक यांनी दिली.

प्रवाशांना धुराचा त्रास

– आगीची तीव्रता वाढल्याने संपूर्ण परिसरात आगीच्या धुराचे लोट पसरले. त्यामुळे लोकल पकडण्यासाठी गर्दी केलेल्या प्रवाशांनी स्थानकाबाहेर धाव घेतली, तर धुरामुळे काही प्रवाशांना त्रास झाला.

– दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पालिका प्रशासन आणि पोलीस करीत आहेत.

पश्चिम रेल्वेवर परिणाम

चर्चगेट स्थानकात लागलेल्या आगीमुळे पश्चिम रेल्वेवर परिणाम झाला. त्यामुळे इतर रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाली. तर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येईल, अशी माहितीही पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;