हिंदुस्थानकडून शस्त्रसंधी ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळेच! रशियाचाही अमेरिकी दाव्याला दुजोरा

हिंदुस्थानकडून शस्त्रसंधी ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळेच! रशियाचाही अमेरिकी दाव्याला दुजोरा

अमेरिकेच्या मध्यस्थीमुळेच हिंदुस्थान आणि पाकिस्तानात शस्त्र्ासंधी झाली. आपल्यामुळेच दोन्ही देशांमधील सशस्त्र्ा संघर्ष थांबला, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत आहेत. बुधवारी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी ट्रम्प यांनी पह्नवर 75 मिनिटे चर्चा केली. यावेळीही ट्रम्प यांनी शस्त्र्ासंधीचा पुनर्रुच्चार केला असून, अमेरिकेच्या या दाव्याला रशियानेही दुजोरा दिला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना हिंदुस्थानी लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने ड्रोन हल्ले करीत सीमा भागातील नागरिकांना टार्गेट केले. मात्र, हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानचे ड्रोन उद्ध्वस्त करीत हल्ले परतवून लावले. चार दिवस हा सशस्त्र्ा संघर्ष सुरू असताना अचानक हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये शस्त्र्ासंधी झाल्याची घोषणा केली गेली. धक्कादायक म्हणजे या अधिकृत घोषणेपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्र्ासंधी जाहीर केली होती. यानंतर ट्रम्प सातत्याने ‘आपल्यामुळे शस्त्र्ासंधी झाली. टेरिफ लावण्याचा इशारा दिल्यामुळे हिंदुस्थानने शस्त्र्ासंधी केली’, असे दावे करत आहेत. मात्र, पेंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत ट्रम्प यांचे नाव घेऊन हा दावा फेटाळलेला नाही. त्यातच आता रशियानेही अमेरिकेच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.

रशियाने काय माहिती दिली

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी रशियाच्या हवाल्याने ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे सहकारी युरी उशाकोवा यांनी खुलासा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि राष्ट्रपती पुतीन यांची बुधवारी पह्नवर 75 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाचाही विषय निघाला. त्यावेळी ट्रम्प यांनी आपल्यामुळेच हिंदुस्थानने शस्त्र्ासंधी केली, असे पुतीन यांना सांगितले. विशेष म्हणजे युरी अशाकोवा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी जयराम रमेश यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;