अमेरिकेत 1244 कोटी रुपयांचा अपहार, हिंदुस्थानी वंशाचे तन्मय शर्मा यांना अटक

अमेरिकेत 1244 कोटी रुपयांचा अपहार, हिंदुस्थानी वंशाचे तन्मय शर्मा यांना अटक

अमेरिकेत राहणाऱ्या हिंदुस्थानी वंशाच्या तन्मय शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. शर्मा हे अमेरिकेत फार्मा कंपनीने मालक असून हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

तन्मय शर्मा हे सॉवरेन हेल्थ ग्रुपचे संस्थापक आणि माजी सीईओ आहेत. तन्मय शर्मा यांच्यावर तीन उपचार सुविधांसाठी बेकायदेशीररित्या कमिशन घेतल्यासह आठ आरोप लावण्यात आले आहेत. शर्मा यांच्या कंपनीने अनधिकृत एका टेस्टसाठी विमा कंपनीला बिल पाठवून 29 मिलियन डॉलर्सचा गैरव्यवहार केला आहे.

तसेच रुग्णांना दुसरीकडे रेफर करण्यासाठी 21 मिलियन डॉलर्सचे बेकायदेशीर कमिशन घेतल्याचा आरोप आहे. या व्यवहार लपवण्यासाठी शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खोटे कॉन्ट्रॅक्ट बनवले होते. शर्मा यांनी 1244 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;