राफेल लढाऊ विमानाचा मुख्य भाग आता हिंदुस्थानात बनणार, टाटा समूहाचा डसॉल्ट एव्हिएशनसोबत करार

राफेल लढाऊ विमानाचा मुख्य भाग आता हिंदुस्थानात बनणार, टाटा समूहाचा डसॉल्ट एव्हिएशनसोबत करार

राफेल लढाऊ विमानाचा मुख्य भाग आता हैदराबादमध्ये बनवला जाईल. या मुख्य भागाला फ्यूजलेज असे म्हणतात. हिंदुस्थानातील टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) ने यासाठी फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशनसोबत चार उत्पादन हस्तांतरण करार केला आहे. राफेलचा मुख्य भाग फ्रान्सच्या बाहेर बनवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. राफेलचे पहिले फ्यूजलेज युनिट 2028 मध्ये असेंब्ली लाईनवरून बाहेर पडेल. हैदराबादमध्ये बांधल्या जाणाऱ्या उत्पादन प्रकल्पातून दरमहा दोन पूर्ण मुख्य भाग तयार होण्याची अपेक्षा आहे. टाटा आणि डसॉल्टमधील या भागीदारीमुळे हिंदुस्थानातील संरक्षण क्षेत्रात खाजगी कंपन्यांचा सहभाग वाढणार आहे.

हिंदुस्थान आणि फ्रान्समधील संरक्षण सहकार्यातील हा प्रकल्प एक मोठे पाऊल असल्याचे डसॉल्ट म्हणाले. यामुळे आता हिंदुस्थानात संरक्षण उपकरणे तयार करण्याची क्षमता वाढेल आणि स्थानिक अभियंत्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळेल. राफेल आणि मिराज 2000 सारख्या विमानांचे पार्टस् तयार करण्यासाठी टाटा ग्रुप डसॉल्टसोबत काम करत आहे. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्सचे सीईओ सुकरण सिंग म्हणाले, “ही भागीदारी हिंदुस्थानच्या विमान निर्मितीच्या प्रवासातील एक मोठे पाऊल आहे. राफेलच्या संपूर्ण मुख्य भागाचे हिंदुस्थानात उत्पादन करणे हे टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्सच्या क्षमतेवरील वाढता विश्वास आणि डसॉल्ट एव्हिएशनशी असलेले आमचे मजबूत संबंध दर्शवते. “जगातील सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मना आधार देऊ शकणारी आधुनिक आणि मजबूत एरोस्पेस उत्पादन प्रणाली तयार करण्यात हिंदुस्थानने प्रचंड प्रगती केली आहे याचा हा पुरावा आहे.”

लढाऊ विमानातील कॉकपिट हे फ्यूजलेजच्या वरच्या भागात असते. शस्त्रे पंखांवर बसवलेली असतात आणि इंजिन आणि इंधन फ्यूजलेजच्या मागील भागात ठेवलेले असते. विमानात वैमानिक फ्यूजलेजच्या पुढच्या बाजूला कॉकपिटमध्ये बसतात. प्रवासी आणि सामान हे विमानाच्या मागील बाजूस असतात आणि इंधन पंखांमध्ये साठवले जाते.

डसॉल्ट एव्हिएशन ही एक फ्रेंच कंपनी संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात काम करते. ही कंपनी राफेल आणि मिराज 2000, फाल्कन बिझनेस जेट्स आणि ड्रोन सारखी लढाऊ विमाने बनवते. 2016 पासून 36 राफेल विमानांच्या कराराद्वारे आणि 2025 मध्ये 26 राफेल सागरी विमानांच्या कराराद्वारे डसॉल्ट हिंदुस्थानासोबत जोडले गेलेले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

समलिंगी विवाहाला मान्यता नाहीच पण ते कुटुंब बनवू शकतात! मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय समलिंगी विवाहाला मान्यता नाहीच पण ते कुटुंब बनवू शकतात! मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाही, पण याचा अर्थ समलिंगी लोक कुटुंब बनवू शकत नाहीत, असा होत नाही. समलिंगी लोक...
शेंद्रा एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलच्या जागेत पालकमंत्री शिरसाट पुत्राची दारूची कंपनी! इम्तियाज जलील यांचा आरोप
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन
Bangalore Stampede – विराट कोहली विरोधात तक्रार दाखल, विजयाचा जल्लोष नडणार?
ट्रेन 90 मिनिटं लेट, मदत मिळालीच नाही; क्रिकेटरचा एक्स्प्रेसमध्ये दुर्दैवी मृत्यू
Ratnagiri Fort – घेरा यशवंत गडाच्या नवीन बांधकामाची पडझड, ग्रामस्थ संतापले; पुरातत्व विभागाकडून पाहणी
Ratnagiri News – रत्नागिरीत पोलिसांची धडक कारवाई; एकीकडे पाच बैलांची सुटका, दुसरीकडे गांजा जप्त