हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्धबंदी ट्रम्पमुळेच, रशियाचाही दुजोरा! पंतप्रधान मोदी स्पष्टीकरण देणार का? काँग्रेसचा सवाल

हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्धबंदी ट्रम्पमुळेच, रशियाचाही दुजोरा! पंतप्रधान मोदी स्पष्टीकरण देणार का? काँग्रेसचा सवाल

ऑपरेशन सिंदूरनंतर हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असतानाच अचानक दोन्ही देशात युद्धबंदी करार झाला. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यामुळेच ही युद्धबंदी झाल्याचा दावा केला होता. त्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मोदी सरकारमधील मंत्र्यांनी जरी डोनाल्ड ट्रम्प यांचे दावे फेटाळले असले तरी अधिकृतरित्या ट्रम्प यांचा दावा कधीच फेटाळला गेला नाही. दरम्यान युद्धबंदीच्या महिनाभरानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी माझ्या हस्तक्षेपामुळे युद्धबंदी झाल्याचा पुनरुच्चार केला आहे. ट्रम्प यांनी याबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतिन यांना सांगितले. पुतिन यांचे खासगी सल्लागार उरी उशोकाव यांनी ही माहिती दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतिन यांची 4 जून रोजी फोनवरून विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. 75 मिनिटांच्या या फोन संवादात हिंदुस्थान पाकिस्तानमधील युद्धाचा देखील विषय निघाला. त्यावेळी ट्रम्प यांनी आपल्यामुळेच युद्धबंदी झाल्याचे पुतिन यांना सांगितले. पुतिन यांचे सल्लागार उरी उशोकाव यांनी ही माहिती एका पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका होऊ लागली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याबाबत ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे.

”रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे सहकारी युरी उशाकोव यांनी नुकताच खुलासा केला आहे की, 4 जून रोजी राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतिन आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या 75 मिनिटांच्या फोन संवादात हिंदुस्थान-पाकिस्तान मध्ये झालेल्या संघर्षावरही चर्चा झाली. या दोन देशांमधील सशस्त्र संघर्ष थांबवण्यात राष्ट्रपती ट्रम्प यांची भूमिका होती, असे ट्रम्प यांनी पुतिन यांना यावेळी सांगितले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर स्पष्टीकरण देतील का? , असे जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;