अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण, आजपासून होणार ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन दोन वर्ष उलटली तरी अद्याप उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नाव धाराशिव करण्यात आले नव्हते. त्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून सतत पाठपुरावा केला जात होता. त्यासाठी ओमराजेंनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून बुधवारी रेल्वेकडून नाव बदलाचा जीआर काढण्यात आला. या जीआरनुसार उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नाव धाराशिव रेल्वे स्थानक करण्यात आले आहे.
पाठपुराव्याला यश…!
अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण – आता ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’
उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचं नाव आता अधिकृतपणे ‘धाराशिव’ — हा केवळ एक बदल नाही, तर आमच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा विजय आहे!#धाराशिव #शिवसेना #OmrajeNimbalkar… pic.twitter.com/Z31GnwLszA
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) May 21, 2025
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी याबाबत ट्विट करत ही माहिती दिली आहे. ”पाठपुराव्याला यश…! अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण – आता ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’. उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचं नाव आता अधिकृतपणे ‘धाराशिव’. हा केवळ एक बदल नाही, तर आमच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा विजय आहे! असे त्यांनी ट्विट केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List