मुख्यमंत्र्यांना जालन्यात येण्यास लाज वाटते का? विराट मोर्चातील शेतकऱ्यांचा सवाल

मुख्यमंत्र्यांना जालन्यात येण्यास लाज वाटते का? विराट मोर्चातील शेतकऱ्यांचा सवाल

राज्य सरकारच्या नवीन पीक विमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक वगळल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, आज विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी थेट जालन्यातील गांधीचमनपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून संताप व्यक्त केला. यावेळी ‘मुख्यमंत्री साहेब जालन्याला यायला तुम्हाला लाज वाटते का?’ असा सवालही शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारने नवीन पीकविमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक वगळण्यात आल्याचा आरोप करत हा घटक पुन्हा पीकविमा योजनेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आज ३० मे रोजी दुपारी १ वाजता जालन्यातील गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य रॅली काढण्यात आली.

जिल्ह्यातील शेतकरी संघर्ष समितीतील शेतकरी या रॅलीत सहभागी झाले होते. स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक पीकविमा योजनेत नसल्यास एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही. गेल्यावर्षीचं अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे. विहीरींचे थकलेले अनुदान देण्यात यावे, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. जालन्यातील शेतकऱ्यांना सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित ठेवाल तर मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला.

२०२४ मध्ये जालना जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत शासनाकडून मदत मिळालेली नाहीये. तसेच २०२४ मधील फळ पिक विमा अद्यापपर्यंत कशी शेतकऱ्यांना वितरित करणे बाकी आहे. त्यामुळे २०२४ मधील अतिवृष्टी मदत आणि फळ पिक विमा शेतकऱ्यांना तातडीने वितरित करून स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक पिक विमा योजनेत समाविष्ट करावा अशी मागणी या रॅलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केली आहे.

शिवाय मुख्यमंत्र्याना जालन्याला यायला लाज वाटती का? आमचे फक्त मतदानचा तुम्हाला हवे आहे काय? शेजारील बुलढाणा, परभणी या जिल्ह्यापर्यंत तुम्ही येत आहात मग जालन्याला का येत नाहीत असा ही सवाल शेतकऱ्यांनी केला. यावेळी शेतकऱ्यांच्या या भव्य रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होते. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देऊन या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;