IMD Weather Update : प्रचंड वेगानं येतंय नवं संकट, 20 राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी

IMD Weather Update :  प्रचंड वेगानं येतंय नवं संकट, 20 राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी

यंदा देशासह राज्यात वेळेआधीच मान्सूनचं आगमन झालं आहे, मान्सून तब्बल 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील दोन दिवस पूर्वोत्तर, उत्तर-पश्चिम, दक्षिण आणि मध्य भारतामधील वीस राज्यांना आयएमडीकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, वादळ देखील झोडपून काढणार असून, या काळात वाऱ्याचा वेग ताशी 70 किलोमीटर इतका प्रचंड राहण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार एक जूनपासून आसाम, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, याच काळात अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या काही भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे, या पार्श्वभूमीवर या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये देखील पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या काळात हवेचा वेग हा 40 ते 70 किमी प्रति तास इतका राहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये या राज्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये आजपासून ते चार जूनपर्यंत वेगवेगळ्या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर पंजाब आणि हरियाणामध्ये तीन जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दुसरीकडे केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील चार दिवस या राज्यांमधील वेगवेगळ्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला देखील पावसाचा इशारा देण्यात आला असून, विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. बिहारमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;