गुलदस्ता – सिग्नेचर शॉट

गुलदस्ता – सिग्नेचर शॉट

>> अनिल हर्डीकर

मराठी असो की हिंदी, वा अगदी कोणत्याही भाषेतल्या चित्रपटातील नायक-नायिकेची किंवा महत्त्वाच्या पात्रांची पहिली भेट ही बऱयाच वेळा नाटय़पूर्ण असते. आठवायला बसलात तर अशा कैक भेटी तुमच्यासमोर येतील. ‘बॉबी’मधला डिंपल कापडिया व ऋषी कपूर यांच्या भेटीचा तो सिग्नेचर शॉट आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे.

‘तिसरी मंजिल’मध्ये शम्मी कपूर आणि आशा पारेख रेल्वे स्टेशनवर भेटतात. अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना ‘आनंद’मध्ये रमेश देवच्या क्लिनिकमध्ये भेटतात. ज्या ‘जंजीर’ चित्रपटामुळे अमिताभ angry young man झाला त्यातली प्राणबरोबरची अमिताभची पहिली भेट कशी विसरता येईल? ‘फूल और पत्थर’मध्ये चोरी करायला हवेलीत शिरलेल्या धर्मेन्द्रची हवेलीतल्या आजारी बहू मीना कुमारीशी झालेली भेट. ‘इत्तेफाक’मधली नंदा आणि राजेश खन्नाची भेट. या भेटींमध्ये आणखी एक पडद्यावरची भेट रसिक प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत ती होती राज कपूर यांच्या ‘बॉबी’ चित्रपटातील ऋषी कपूर आणि डिंपल कापडिया यांची भेट.

ऋषी कपूरला त्यापूर्वी प्रेक्षकांनी ‘मेरा नाम जोकर’मध्ये पाहिले होते. मात्र डिंपल कापडियाच्या दर्शनाला प्रेक्षक आसुसलेले होते. त्याला एक भक्कम कारण होते ते म्हणजे त्या वेळचा ‘सुपरस्टार’ राजेश खन्ना याच्याशी तिचा 27 मार्च 1973 ला झालेला विवाह. बॉबी प्रदर्शित झाला 28 सप्टेंबर 1973 ला. आजच्याएवढी प्रसार माध्यमे त्यावेळी उपलब्ध नव्हती हे लक्षात घ्यायला हवे. दुसरे आणि महत्त्वाचे कारण होते ते त्या आधीचा राज कपूरचा ‘जोकर’ अपयशी ठरला होता. राज कपूर आणि त्याची सौंदर्यदृष्टी सर्व रसिकांना ज्ञात असल्याने डिंपलला बघायला प्रेक्षक वर्ग साहजिकच उत्सुक होता. बॉबी प्रदर्शित झाला, त्यावेळी डिंपल अवघ्या 16 वर्षांची होती.

बॉबी सुरू झाला. राजा (चिंटू)च्या वाढदिवशी झालेल्या पार्टीत राजाने बॉबीला तिच्या आजीसोबत (गव्हर्नेस दुर्गा खोटे) आलेली असताना ओझरते पाहिलेले असते. तिच्या सौंदर्याने तो मोहीत झालेला आहे. पण तेवढेच! ती एक दृष्टभेट पाहण्यापुरती.

आता खरोखरीची भेट व प्रसंग असा. राजा (ऋषी कपूर)  ब्रिगँजा (प्रेमनाथ) यांच्या घरापाशी आलेला आहे. वरकरणी तो त्याच्यावर लहानपणापासून माया करणाऱया गव्हर्नेसला (दुर्गा खोटे) भेटण्यासाठी आलेला आहे, पण तो त्यांची नात बॉबीची भेट व्हावी या उद्देशाने तिथे आलेला आहे.

राजा ब्रिगँजा यांच्या घराच्या दरवाजापाशी येतो आणि घंटी वाजवतो. स्तिमित करून टाकणारे सौंदर्य लाभलेली बॉबी दरवाजा उघडते. ती स्वयंपाक घरात काम करता करता दरवाजा उघडायला आलेली असल्याने तिच्या हाताला ‘बेसन’ लागलेले आहे. राजाला बघून गोंधळून गेलेली बॉबी तिच्या कपाळावर आलेली केसाची बट आपल्या बेसनने बरबटल्या हाताने मागे सारते… ते बेसन तिच्या डोक्यावरील केसांनासुध्दा लागते.

या एकाच शॉटचे राज कपूर यांनी जवळपास 27 टेक्स घेतले. इतके टेक्स घेतले म्हणजे स्वाभाविकच प्रत्येकच रिटेकनंतर डिंपलला आपले केस धुऊन घ्यावे लागत होते. त्यांचा प्रयत्न हाच होता की तिच्या चेहऱयावरील अद्वितीय असे निरागस भाव यावेत आणि हाताला लागलेले बेसन डोक्यावरील केसांना लागल्याने तिचा साधेपणा ठळकपणे अधोरेखित व्हावा. आपल्याला आठवत असेल त्यावेळी त्या छबीचे प्रेक्षकांना केवढे वेड लागले होते.

मात्र हा शॉट, हा प्रसंग कुणा अन्य दिग्दर्शकाने चित्रित केला असता तर त्याला एवढे महत्त्व लाभले नसते. पण राज कपूर यांनी हा शॉट चित्रित करताना त्यांच्या आयुष्यातला, हृदयाच्या आतल्या कप्प्यातला जपलेला क्षण जसाच्या तसा पडद्यावर दाखवला होता. कारण त्यांची आणि नर्गिस यांची भेट अशीच झाली होती. राज कपूर आणि नर्गिस यांचे नाते काय होते ते जगजाहीर आहे. राज कपूरच्या आरके फिल्म्सचा लोगो बघा ना! असो.

हा प्रसंग चित्रित करताना त्याच्या पस्तीस वर्षांपूर्वी घडून गेलेल्या त्या उभयतांच्या पहिल्या भेटीचं प्रतिबिंब त्यात होते.

राज कपूर यांना ‘आग’च्या यशानंतर दिग्दर्शक म्हणून मान्यता मिळाली होती. ‘बरसात’ या पुढील चित्रपटाच्या निर्मितीसाठी जमवाजमव चालू होती. त्यातील एका भूमिकेसाठी विचारणा करण्यासाठी प्रथमच नर्गिस यांच्या घरी ते गेले असताना नर्गिस घरकामात गुंतल्या होत्या. हात बेसनाने बरबटलेले होते आणि दारावर टकटक झाल्यावर लगबगीने दार उघडण्यासाठी नर्गिस पुढे झाल्या. दार उघडले तर समोर देखणा राज कपूर! त्या पुरत्या गोंधळून गेल्या आणि मग तोंडावर आलेली केसाची बट त्याच बेसनाच्या हाताने त्यांनी मागे केली.

राज कपूर आणि नर्गिस यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग त्यांनी जसाच्या तसा शूट केला, पात्रे फक्त वेगळी होती. 2 जून 1988 रोजी निवर्तलेल्या राज कपूर यांना जाऊन उद्या 37 वर्षे होतील. त्या निमित्ताने त्या कुशल दिग्दर्शकाला, शो मॅनला श्रध्दांजली!

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार? योजनेबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार? योजनेबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता
ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे  अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे....
खुशखबर ! मुंबई-कोकण आता अवघ्या चार तासात, कसं? मग ही बातमी वाचाच..
लग्नाआधी प्रेग्नंट राहिलेली ही बॉलिवूड अभिनेत्री आता दुसऱ्यांदाही होणार आई, म्हणाली ‘आता आरामाची गरज…’
IPL मधून प्रिती झिंटा किती कमावते? तिची एकूण संपत्ती किती?
ही प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांची पूर्वपत्नी, ‘छावा’मधून जबरदस्त कमबॅक
‘आई तुळजाभवानी’चं कथानक अत्यंत रंजक वळणावर; सटवाई लिहिणार देवीचं भविष्य
बॅकलेस रेड ड्रेस अन् दिसला तो टॅटू, मलायकाच्या नव्या फोटोंची तुफान चर्चा!