‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’च्या एका एपिसोडसाठी स्मृती इराणी किती पैसे घेते माहितीये का? ऐकून बसेल धक्का

‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’च्या एका एपिसोडसाठी स्मृती इराणी किती पैसे घेते माहितीये का? ऐकून बसेल धक्का

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून क्योंकी सास भी कभी बहू थी ओळखली जाते. आता अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे. या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. या मालिकेत स्मृती इराणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यावेळीही तिची जोडी अमर उपाध्यायसोबत जमणार आहे. ही मालिकेची निर्मिती एकता कपूर करत आहे. पण या मालिकेसाठी स्मृती इराणी किती मानधन घेत आहे तुम्हाला माहिती आहे का?

स्मृती इराणी किती फी घेत आहे?

‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’ या मालिकेसाठी स्मृती इराणी मोठी फी आकारत आहे. इंडिया फोरमच्या अहवालानुसार, स्मृती इराणी तिच्या आयकॉनिक तुलसीच्या भूमिकेसाठी प्रत्येक एपिसोडसाठी 14 लाख रुपये फी घेत असल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याशिवाय, असंही कळतंय की स्मृती इराणी Z+ सुरक्षेत शूटिंग करत आहे. सेटवर कठोर प्रोटोकॉल पाळले जात आहेत, ज्यात फोन टॅपिंग आणि प्रवेशावर निर्बंध यांचा समावेश आहे.

वाचा: व्हर्जिन बायको शोधू नका.. ती एका रात्रीत संपते; प्रियांका चोप्राचे ते वक्तव्य चर्चेत

स्मृती इराणीचा शो कधीपासून सुरू होणार?

मनी कंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने लिहिलं आहे की, मालिकेच्या पोस्टरचं शूटिंग पूर्ण झालं आहे. प्रोमो शूटिंगच्या तयारीला सुरुवात झाली आहे. स्मृती इराणीच्या या पुनरागमनाची जोरदार तयारी सुरू आहे. मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. परंतु असं सांगितलं जात आहे की, मालिकेचा दुसरा सीझन पहिल्या सीझनच्या प्रदर्शनाच्या तारखेलाच रिलीज होऊ शकतो.

क्योंकी सास भी कभी बहू थी ही अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत तुलसीची कहाणी दाखवण्यात आली होती. मालिकेत दाखवलं गेलं होतं की, तुलसी जेव्हा सून होती तिला कशी वागणूक मिळायची आणि नंतर जेव्हा ती सासू बनली तेव्हा ती कशा वागत होती हे दाखवण्यात आले आहे. पहिल्या सीझनचा पहिला भाग 3 जुलै 2000 रोजी प्रदर्शित झाला होता. त्यामुळे आता दुसरा सीझन कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डिजिटल व्यवहार चोरट्यांच्या पथ्यावर; सायबर फसवणुकीच्या घटना वाढल्या डिजिटल व्यवहार चोरट्यांच्या पथ्यावर; सायबर फसवणुकीच्या घटना वाढल्या
नोटबंदी आणि कोरोना काळापासून डिजिटल पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. आता तर डिजिटल अरेस्टचा धाक दाखवून हे भामटे सर्रास लूट...
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण – हगवणे कुटुंबीयांचे जेसीबी मशीन जप्त
लग्नात स्कोडा; 15 तोळे सोने देऊनही पैशांसाठी मारहाण; महिला आयोगाकडून तक्रारीची दखल नाही – ऐश्वर्या हुलावळे
पीएमपीएल तिकीट दरवाढीला शिवसेनेचा विरोध
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 3 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
डिंभे कालव्यावरील पूल कोसळला; नागरिकांच्या अडचणी वाढल्या
माझी उणी-दुणी काढाल तर मी सोडणार नाही!