दातांचं आरोग्य वाचवायचंय? मग गोड पेयांबाबत घ्या ‘ही’ खबरदारी

दातांचं आरोग्य वाचवायचंय? मग गोड पेयांबाबत घ्या ‘ही’ खबरदारी

नवी दिल्लीतील एम्स (AIIMS) तज्ज्ञांनी पालकांना एक महत्वाचा इशारा दिला आहे. तुम्हाला वाटत असेल की फक्त चॉकलेट, टॉफी, बिस्किट आणि चिप्सच दात खराब करतात, तर तुम्ही चुकीचे आहात. एम्सच्या तज्ज्ञांच्या मते, गोड दूध आणि फळांचा ज्यूसदेखील दातांना तितकेच नुकसान पोहोचवू शकतात, विशेषतः जेव्हा मुले हे वारंवार घेतात आणि त्यानंतर दात साफ करत नाहीत.

हेल्दी ड्रिंक की धोका?

पालकांना वाटते की मुलांना दूध आणि ज्यूस वारंवार देणे हे आरोग्यासाठी चांगले आहे. पण एम्सच्या दंत तज्ज्ञांच्या मते, दिवसातून अनेकदा दूध आणि ज्यूस पिणे हे दातांसाठी धोकादायक ठरू शकते. हे पेय गोडसर असल्याने त्यातील साखर दातांवर चिकटून राहते आणि यामुळे कॅव्हिटी (दात सडणे) होण्याची प्रक्रिया सुरू होते.

हेल्दी स्माइल

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)**च्या दंत शिक्षण व संशोधन केंद्राने ‘हेल्दी स्माइल’ नावाचे मोबाइल अ‍ॅप लॉन्च केले आहे. यामध्ये मुलांच्या दातांची योग्य काळजी कशी घ्यावी, याविषयी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. एम्स एक्सपर्ट्सनी पालकांना विशेषत: मुलांच्या दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

कधी आणि कशी होते कॅव्हिटी?

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा मूल दिवसभरात 3 वेळांपेक्षा जास्त वेळा गोड आणि चिकटणाऱ्या वस्तू (टॉफी, कँडी, बिस्किट, चिप्स, वेफर्स, गोड पेय दूध, ज्यूस, कोल्ड ड्रिंक, फ्रूटी) घेतं आणि दात घासत नाही, तेव्हा दात सडायला सुरुवात होते. जसजसे हे पदार्थ जास्त प्रमाणात घेतले जातात, तसतसे सडणं वाढतं आणि अखेर ते दातांना पूर्णपणे खराब करतं.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या फक्त लहान मुलांच्या दूधाच्या दातांपुरती मर्यादित नाही. सहा वर्षांनंतर येणारे कायमस्वरूपी दातसुद्धा या सडण्याच्या प्रक्रियेत अडकू शकतात. त्यामुळे पालकांनी सुरुवातीपासूनच काळजी घेणे गरजेचे आहे.

तज्ज्ञ सांगतात की, मुलांचे वय फक्त सहा महिने असले तरी त्यांच्या तोंडात आलेल्या पहिल्या दातांची देखील काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. गोड काहीही खाल्ल्यानंतर दात स्वच्छ करणं आवश्यक आहे. यामुळे केवळ दात सडण्यापासून बचाव होत नाही, तर तोंडातील बॅक्टेरिया वाढणंही थांबतं आणि दात निरोगी राहतात.

ही समस्या फक्त मुलांपुरती मर्यादित नाही. जर प्रौढांनीसुद्धा गोडसर पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर दात नीट स्वच्छ केले नाहीत, तर त्यांच्याही दातांमध्ये किड लागू शकतो. सकाळी आणि झोपण्यापूर्वी ब्रश न केल्यास दातांमध्ये सडणं वाढतं, जे नंतर त्रासदायक ठरू शकतं.

शेवटी काय कराल?

तज्ज्ञांचा सल्ला स्पष्ट आहे गोड खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर दात नीट स्वच्छ करा, नियमित ब्रश करा आणि दंत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अगदी गोड दूध किंवा फळांचा ज्यूससुद्धा योग्य काळजी न घेतल्यास दातांसाठी हानिकारक ठरू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा हा अवयव 10 वर्षे जिवंत राहतो; जाणून आश्चर्य वाटेल मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा हा अवयव 10 वर्षे जिवंत राहतो; जाणून आश्चर्य वाटेल
जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याचे शरीर जाळले जाते किंवा पुरले जाते . अशा परिस्थितीत, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल...
अख्खा भाजप म्हणजेच रेव्ह पार्टी, संजय राऊत यांचा घणाघात
अमित शहांना पंतप्रधान व्हायचंय पण मोदी होऊ देणार नाहीत, संजय राऊत यांचा मोठा दावा
हरिद्वारच्या मनसा मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू
पालखीतील वारकऱ्यांसाठी ‘कळण्याची भाकरी व ठेच्याचा बेत, माळीपेठ वासीयांचा 20 वर्षांचा स्तुत्य उपक्रम
महायुतीचे सरकार विश्वासघातकी; शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले : जयश्री शेळके
देवळावर डल्ला… दानपेटी, घंटा, समया चोरणे हाच त्याचा धंदा; रेवदंड्यातील चोरट्याला अटक