छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, सुरक्षा दलाच्या गोळीबारात चार नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, सुरक्षा दलाच्या गोळीबारात चार नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील विजापूर येथे शनिवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून अत्याधुनिक रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. परिसरात अद्याप गोळीबार सुरू असल्याचे बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले.

विजापूर जिल्ह्याच्या नैऋत्य वनक्षेत्रात काही नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. आतापर्यंत चकमकीत सुरक्षा दलाने चार नक्षलवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात इन्सास आणि एसएलआर सारख्या अत्याधुनिक रायफल्स जप्त केल्या. परिसरात अद्याप कारवाई सुरु आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा हा अवयव 10 वर्षे जिवंत राहतो; जाणून आश्चर्य वाटेल मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा हा अवयव 10 वर्षे जिवंत राहतो; जाणून आश्चर्य वाटेल
जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याचे शरीर जाळले जाते किंवा पुरले जाते . अशा परिस्थितीत, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल...
अख्खा भाजप म्हणजेच रेव्ह पार्टी, संजय राऊत यांचा घणाघात
अमित शहांना पंतप्रधान व्हायचंय पण मोदी होऊ देणार नाहीत, संजय राऊत यांचा मोठा दावा
हरिद्वारच्या मनसा मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू
पालखीतील वारकऱ्यांसाठी ‘कळण्याची भाकरी व ठेच्याचा बेत, माळीपेठ वासीयांचा 20 वर्षांचा स्तुत्य उपक्रम
महायुतीचे सरकार विश्वासघातकी; शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले : जयश्री शेळके
देवळावर डल्ला… दानपेटी, घंटा, समया चोरणे हाच त्याचा धंदा; रेवदंड्यातील चोरट्याला अटक