ब्रेक फेल झालेल्या भरधाव कंटेनरने दोन किलोमीटरपर्यंत 20 गाड्यांना चिरडत नेले

ब्रेक फेल झालेल्या भरधाव कंटेनरने दोन किलोमीटरपर्यंत 20 गाड्यांना चिरडत नेले

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज दुपारी भयंकर अपघात झाला. एका भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने या कंटेनरने तब्बल दोन किलोमीटरपर्यंत 20 गाड्यांना चिरडत नेले. ही घटना एक्स्प्रेस वेवरील नवीन बोगद्याजवळील बायपास ते फुडमॉलदरम्यान घडली. या अपघातात बस, कार, ट्रेलर, टेम्पो अशा 20 गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात एक महिला ठार झाली असून जवळपास 50 जण जखमी झाले आहेत. त्यात लहान मुले, महिला आणि वृद्धांचाही समावेश आहे. जखमींना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले असून काही जणांवर खोपोलीतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे बोरघाटातील वाहतूक एक तास ठप्प झाली होती.

पुण्याहून मुंबईकडे जाणारा कंटेनर (क्रमांक एम.एच 46-बी.यू. 3506 ) हा खोपोली हद्दीतील नवीन बोगद्यात येताच त्याचा ब्रेक फेल झाला आणि या कंटेनरने समोरील वाहनांना जोरदार धडक दिली. ब्रेक फेल झालेल्या खोपोली बायपासपासून सुसाट निघालेल्या कंटेनरने पुढे तब्बल दोन किलोमीटर अंतरातील फुडमॉलपर्यंत समोर येईल त्या गाड्यांना धडक दिली. त्यामुळे एकच हलकल्लोळ उडाला. हा कंटेनर पुढे कठड्यावर आदळून थांबला असता चालकाने उडी मारून जीव वाचवला.

कंटेनरने धडक दिलेल्या बसमधील 15 प्रवासी जखमी झाले, तर कार, टेम्पो, ट्रेलरमधील काही जण जखमी झाले. या अपघातात अनिता वेरवंडे (35) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. जखमींना खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातग्रस्त मदत टीम, बोरघाट पोलीस आणि खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;