सार्वजनिक गणेशोत्सवाचा मराठी फलक उतरवला. कर्नाटकची सीमाभागात मराठी भाषिकांवर पुन्हा मुजोरी

सार्वजनिक गणेशोत्सवाचा मराठी फलक उतरवला. कर्नाटकची सीमाभागात मराठी भाषिकांवर पुन्हा मुजोरी

मराठी द्वेषाने पछाडलेल्या बेळगाव महापालिकेने शुक्रवारी पाटील गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा शहीद भगतसिंग चौकातील मराठी फलक रातोरात जबरदस्तीने हटविला. 60 टक्के कन्नड सक्तीचा आदेश केवळ  दुकानांपुरता असतानाही महापालिकेने मंडळाच्या फलकावरही कन्नड सक्ती केल्याने गणेशभक्तांनी संताप व्यक्त केला आहे.

शहीद भगतसिंग चौकात बाप्पाच्या आगमन सोहळय़ाचा मराठी भाषेतील फलक उभारला होता, पण हा फलक मराठीत असल्याने महापालिकेने हटवला. दुकानांना लागू असलेला नियम धार्मिक कार्यक्रमांना का लावण्यात येत आहे, असा जाब मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारला असता, आम्ही फक्त वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगून त्यांनी काढता पाय घेतला. मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, महापालिकेच्या मनमानी कारवाईचा निषेध केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;